AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R I P.. ‘धुरंधर 2’चा टीझर पाहून दिग्दर्शकाची अशी पोस्ट; थेट दिला इशारा

'धुरंधर 2'चा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो व्हायरल होऊ लागला आहे. रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या टीझरबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत आली आहे.

R I P.. 'धुरंधर 2'चा टीझर पाहून दिग्दर्शकाची अशी पोस्ट; थेट दिला इशारा
Ranveer Singh in Dhurandhar 2Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2026 | 10:45 AM
Share

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर त्याच्या सीक्वेलविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी ‘धुरंधर 2’चा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधील धमाकेदार अॅक्शन पाहिल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. आता लवकरात लवकर ट्रेलर आणि त्यानंतर चित्रपटसुद्धा प्रदर्शित करा, अशी भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. फक्त प्रेक्षकच नाही तर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही या टीझरचं कौतुक केलं आहे. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने ‘धुरंधर 2’च्या टीझरबद्दल लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

‘धुरंधर 2’चा टीझर शेअर करत राम गोपाल वर्माने लिहिलं, ‘हा सूड नाही, हा आदित्य धरचा राग आहे. मला त्या लोकांवर दया येते जे याच्या मार्गात येतील. R I P (रेस्ट इन पीस).’ या पोस्टमधून त्याने ‘टॉक्सिक’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा इशारा दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण 19 मार्च रोजीच आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटासोबतच साऊथ सुपरस्टार यशचा बहुचर्चित ‘टॉक्सिक’सुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे ‘धुरंधर’चा पहिला भाग फक्त हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला होता, तरीसुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त हिंदी भाषेतच 1000 कोटी रुपयांची कमाई करत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चा रेकॉर्ड मोडला होता. आता ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पॅन-इंडिया म्हणजेच हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची यशच्या ‘टॉक्सिक’ला मोठी टक्कर असेल.

‘धुरंधर’ने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामध्ये रणवीर सिंहसोबतच अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. रणवीरच्या करिअरमधील हा सर्वांत मोठा आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

‘धुरंधर 2 : द रेव्हेंज’च्या टीझरमध्ये रणवीर सिंहचा 2.0 अंदाज पहायला मिळतोय. या टीझरची सुरुवातच हिंसक दृश्याने होते आणि पुढेही अशी बरीच दृश्ये पहायला मिळतात, ज्यामुळे अंगावर अक्षरश: काटा येतो. रणवीर सिंह हा हमजा कसा बनला, या प्रवासाची झलक या टीझरमध्ये दिसतेय. त्याचसोबत रेहमान डकैतच्या मृत्यूनंतर संपूर्ण कराचीवर त्याचं राज्य कसं निर्माण होतं आणि त्यासाठी तो काय-काय करतो, हे सर्व यात दाखवण्यात आलं आहे. यामध्ये अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या भूमिकांचीही झलक पहायला मिळतेय.

Follow Us
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन