‘माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न…’, धुरंधर स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली – सेटवर तो..

बिग बॉस 17 फेम आयेशा खानने सार्वजनिक जीवनातील महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या कठीण परिस्थितीचा आणि ऑनलाइन लैंगिक शोषणाचा धक्कादायक खुलासा केला आहे. तिला दररोज बलात्काराच्या धमक्या येतात, तसेच तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही झाल्याचे तिने सांगितले. ऑनलाइ ट्रोलिंगपासून ते अश्लील कमेंट्सपर्यंत, आयेशाने तिच्या मानसिक वेदना आणि महिलांवरील अत्याचाराचे भयाण वास्तव मांडले आहे.

माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न..., धुरंधर स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - सेटवर तो..
आयेशा खानचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 9:32 AM

बिग बॉस 17 फेम आयेशा खान ही धुरंधरमधल्या गाण्याने खूपच चर्चेत आली. तिच्या गाण्यावर सगळेच फिदा आहेत, अनेक ठिकाणी हे गाणं वाजत असतं. त्याची हूक स्टेप तर बहुतांश जणांना पाठ आहे. या आयेशा खानने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सार्वजनिक जीवनात महिलांना ज्या आव्हांनाचा, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्याबद्दल ती नुकतीच मोकळेपणाने बोलली. अलिकडेच झालेल्या मोजो स्टोरी समिटमध्ये बोलताना, आयेशाने ऑनलाइन लैंगिक शोषण, लैंगिक हिंसाचाराच्या धमक्या आणि बलात्काराचा प्रयत्न यासारखे तिचे स्वतःचे क्लेशकारक अनुभवही शेअर केले. “शरारत” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मासिक पाळी सुरू असल्याची प्रामाणिक कबुली तिने दिली होती, तेव्हा बराच त्रास सहन करावं लागल्याचंही तिने सांगितलं होतं, मात्र या कबुलीनंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला, असे तिने उघड केले. दररोज मिळणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांद्दल चर तिने सांगितलंच पण त्यानंतर तिने आणखी एक मोठा, हादरवणारा खुलासाही केला. एकदा माझ्यावर बलात्काराचा प्रयत्नही झाला होता, असं तिने उघड केलं, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सुरूवातीपासूनच ट्रोलिंगची शिकार

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आयेशा ही सोशल मीडियावर ट्रोलिंगचे लक्ष्य ठरली आहे. काहीव दिवसांपूर्वी तिने एका मुलाखत दिली होती, “धुरंधर” चित्रपटातील “शरारत” हे गाणं शूट केलं तेव्हा माझे पीरियड्स (मासिक पाली) सुरू होती, खूप त्रास झाला, असं आयेशाने या मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र त्यानंतर तिला खूपच ट्रोल करण्यात आल. हे फक्त एक उदाहरण आहे, खरी वेदना तर यापेक्षा अधिक खोल आहे, असं ती पुढे म्हणाली.

सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स

इन्स्टाग्रामवर दररोज माझ्या शरीराबद्दल अश्लील कमेंट्स केलया जातात, असं आयेशाने सांगितलं. “मी साधा टॉप घातला तर लोकांना अडचण असते आणि मी जरी स्कर्ट घातला तरी, त्यांना प्रॉब्लेम असतो. एखादी पोस्ट करण्यापूर्वी काय घालायचं, याचा मला बराच विचार करावा लागतो” असं आयेशाने सांगितलं. अशा वातावरणात राहणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक आहे, असंही तिने कबूल केलं. ” प्रत्येक वेळेसे एखादी पोस्ट करण्यापूर्वी किंवा ड्रेस घालण्यापूर्वी मला जर लोकांचा विचार करण्याची, गैरसमज होणार नाही ना, याची चिंता करावी लागत असेल, तर ती किती दुःखद मानसिकता आहे.” अशा शब्दांत तिने तिची व्यथा मांडली.

ऑनलाइ रेपच्या धमक्या मिळतात का, असं विचारल्यावर तिची प्रतिक्रिया तर हादरवणारीच होत. ती म्हणाली, ‘हो, अगदी दररोज, मी आत्ताही तुम्हाला फोन उघडून (धमक्या) दाखवू शकते. पब्लिक फिगर असलेल्या महिलांना हा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावा लागतो. इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेला कधी ना कधी हे सहन करावचं लागलं असेल’, असंही तिने नमूद केलं.

माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न 

यावेळी बोलताा आयेशाने तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक, वेदनादायी अनुभव कथन केला. “माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, पण कधीकधी ती जखम पुन्हा उघडतं” असं म्हणताना ती अतिशय इमोशनल झाली होती. ऑनलाइन ज्या धमक्या मिळतात,त्यामुळे जुन्या जखमा पुन्हा भळभळून वाहू लागतात. मी सेटवर असते किंवा प्रवासात असते, तेव्हा तशीच दुर्दैवी घटना पुन्हा घडून नये अशी भीती मला वाटत रहाते असं आयेशाने नमूद केलं.

तिच्या खऱ्या आयुष्यातील आणखी एक भयानक अनुभव कथन करताना आयेशा म्हणाली, मी एकदा एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. आणि माझे वडीलही तिथे होते. अचानक, मी इंस्टाग्राम चेक केलं, तेव्हा लक्षात आलं की एक माणूस खूप दिवसांपासून व्हॉइस नोट्स पाठवत होता. त्याची पडताळणी केल्यावर लक्षात आलं की तो इसम म्हणजे तिच्या सेटवरचाच एक स्पॉटबॉय होता. त्यानंतर आयशाने ताबडतोब तिच्या वडिलांकडे आणि प्रॉडक्शन टीमकडे तक्रार केली, पुढे आरोपीवर कारवाई करण्यात आली. मात्र यामुळे ती खूपच हादरली होती.

Follow Us