Ikka Teaser : अंगावर काटा आणणारा इक्काचा टीजर VIDEO, अक्षय-सनी दोन धुरंधरांच्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी

Ikka Teaser : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना आणि सनी देओल सध्या करिअरच्या पीकवर आहेत. फॅन्सना आता दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहता येणार आहे. अक्षय आणि सनीचा चित्रपट इक्काचा टीजर समोर आलाय.

Ikka Teaser : अंगावर काटा आणणारा इक्काचा टीजर VIDEO, अक्षय-सनी दोन धुरंधरांच्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी
Sunny deol-akshaye khanna
| Updated on: Feb 05, 2026 | 2:52 PM

धुरंधरसाठी अक्षय खन्ना आणि बॉर्डर 2 मुळे सनी देओलची चर्चा आहे. दोघांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. आज जे यश त्यांना मिळतय, त्याची अपेक्षा त्यांनी केली नव्हती. धुरंधरमधील अक्षय खन्नाची स्टाइल, अभिनय प्रेक्षकांना भावला. सनी देओलने बॉर्डर 2 मध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना दोघांचे स्टार्स सध्या जोरात आहेत. अशावेळी दोघे एकत्र आले, तर ती फिल्म किती भन्नाट होईल.

सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी हे घडवून आणलय. इक्का या पुढच्या चित्रपटात सनी आणि अक्षय दोघे एकत्र दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर या फिल्मचा फर्स्ट लूक समोर आलाय. इंटरनेटवर इक्काची हवा आहे. धुरंधर 2 चा टीजर रिलीज झालेला असताना इक्काचा ट्रेलर आलाय.

इक्का कडून भरपूर अपेक्षा

नेटफ्लिक्सने या फिल्मचा फर्स्ट लूक शेअर केलाय. जो व्हायरल झाला आहे. सनी पाजी पुन्हा एकदा दामिनीच्या लूकमध्ये पहायला मिळतायत. ते चित्रपटात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय खन्ना आरोपीच्या रोलमध्ये असेल. चित्रपटात संजीदा शेख, दिया मिर्झा आणि तिलोत्मा शोम या अभिनेत्रींचा दमदार अभिनय पाहता येईल. महाराजचे मेकर्स हा चित्रपट बनवतायत. इक्का कडून भरपूर अपेक्षा आहेत.

अभियनाची जुगलबंदी

चित्रपटाच्या कथेबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाची रिलीज डेटही समजलेली नाही. पण अक्षय खन्ना आणि सनी देओल यांच्या अभियनाच्या जुगलबंदी फॅन्ससाठी कुठल्या पार्टीपेक्षा कमी नाही. फिल्मचा फर्स्ट लूक समोर आलाय. आदित्य धरच्या धुरंधर 2 द रिवेंजचा फर्स्ट लूकही दिसलाय. धुरंधर मध्ये अक्षय खन्नाने रहमान डकैत या गँगस्टरची भूमिका बजावली होती. पहिल्या पार्टमध्ये या पात्राचा मृत्यू झाला. त्यामुळे अक्षय खन्ना दुसऱ्या भागात दिसणार नाही. फॅन्सना इक्कामधून अक्षय खन्नाचा जबरदस्त अभिनय अनुभवता येईल.