दिलजीत दोसांझने लंडनमध्ये प्यायली सर्वात महागडी कॉफी; प्रत्येक घोटाची किंमत जाणून धक्का बसेल

दिलजीत दोसांझच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. त्याने लंडनमधील सर्वात महागडी कॉफी प्यायल्याचं त्या व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. पण त्या कॉफीची किंमत जाणून खरंच कोणालाही धक्का बसेल. शिवाय या कॉफित असं काय खास आहे असा प्रश्नही पडेल.

दिलजीत दोसांझने लंडनमध्ये प्यायली सर्वात महागडी कॉफी; प्रत्येक घोटाची किंमत जाणून धक्का बसेल
Diljit Dosanjh drank the most expensive coffee
Image Credit source: instagram
| Updated on: May 28, 2025 | 7:32 PM

बॉलिवूड आणि पंजाबी म्यूजिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. दिलजीत सध्या लंडनमध्ये आहे आणि सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. त्याचे कॉसर्ट हे जगभर सुरु असतात. दिलजीत त्याच्या पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांसोबत त्याचे प्रत्येक क्षण शेअर करत असतो. अलिकडेच, दिलजीतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लंडनमधील सर्वात महागडी कॉफी पिण्याचा आनंद घेताना दिसत आहे. पण या एक कप कॉफीची किंमत जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

‘जापान टायपिका’ नावाची खास कॉफी

दिलजीतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिलजीत त्याच्या गाडीतून उतरतो आणि म्हणतो की, “आज मी लंडनमधील सर्वात महागडी कॉफी पिण्यासाठी आलो आहे”, हे बोलून झाल्यावर, दिलजी एका स्टायलिश कॅफेमध्ये पोहोचतो आणि मेनू ऑर्डर करतो. काळा आणि पांढऱ्या रंगाचे जॅकेट, स्टायलिश टोपी असा त्याचा हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याने त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिलजीतने कॅफेमध्ये ‘जापान टायपिका’ नावाची खास कॉफी ऑर्डर केली. पण कॉफी पाहताच त्यालाही धक्का बसला.

दिलजीतने प्यायली सर्वात महागडी कॉफी

दिलजीतने कॉफी पाहून म्हटलं भारतात याची किंमत 31000 रुपयांपेक्षा जास्त आहे. व्हिडिओमध्ये पुढे, दिलजीत सर्वांना महागडी कॉफी कशी सर्व्ह करायची हे देखील दाखवतो. वेटर त्याला सांगतो की त्याची कॉफी पूर्णपणे शुद्ध आहे. तथापि, कॉफी पिल्यानंतर, गायक म्हणतो की या कॉफीच्या प्रत्येक घोटाची किंमत 7000 रुपये आहे. तथापि, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव दर्शवितात की या महागड्या कॉफीला काही विशेष वेगळी चव अशी नव्हती.


महागड्या कॉफीची चव कशी होती? 

कॉफी पिऊन झाल्यावर दिलजीत त्याच्या विनोदी शैलीत आणि पंजाबी भाषेत म्हणतो की, ‘जर आपल्याला मजा येत नसेल तर आपण मजा केल्यानंतरच आता निघायचं” दिलजीतचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांना दिलजीतचा विनोदी शैलीही खूप आवडतेय. आणि सर्वजण त्याचे कौतुकही करताना दिसत आहेत. काही वापरकर्त्यांनी विनोदाने कमेंटही केली की ,’आपण इतक्या पैशांमध्ये महिनाभराची चहा पिऊ शकतो”.