Dimple Kapadia : त्यांचा स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजू…नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Dimple Kapadia On Nana Patekar : सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका मुलाखतीत डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल भाष्य केलेलं.

हिंदी आणि मराठी इंडस्ट्री गाजवलेले नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानं कलाविश्वावर शोककळा पसरली असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. अनेक कलाकारांनी नानांसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे. अशातच एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल भाष्य केलेलं. खलनायक असो, पोलीस अधिकारी असो, विनोदी असो, देशभक्तीपर असो किंवा गंभीर असो, नानांनी प्रत्येक भूमिका पडद्यावर मोठ्या अचूकतेनं साकारली. पण मग एक काळ असा आला जेव्हा #MeToo चळवळीदरम्यान अभिनेत्यावर आरोप झाले.
डिंपल कपाडिया यांनी नानांबद्दल केलेला खुलासा
नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रहार, द फायनल अटॅक, अंगार, क्रांतीवीर आणि तुम मिलो तो सही यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. डिंपल कपाडिया यांना नानांच्या वागणुकीबद्दल माहिती होती. एकदा चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना डिंपल म्हणाल्या की, नाना पाटेकर एक खूप चांगले अभिनेते आहेत, पण त्यांचा स्वभाव तापट आहे.
त्या मुलाखतीत अनुपमानं डिंपल यांना नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल विचारलं असता डिंपल कपाडिया म्हणालेल्या की, ‘त्यांच्या प्रतिभेची तुलनाच होऊ शकत नाही. ते खूप प्रतिभावान व्यक्ती आहेत. जेव्हा मी त्यांच्यासारखी व्यक्ती पाहते, तेव्हा त्यांच्या अनेक चुका माफ केल्या जातात, अगदी जीव घेतला तरी चालेल. अभिनयाच्या बाबतीत त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. एक व्यक्ती म्हणून ते माझे खूप चांगले, दयाळू मित्र आहेत. पण मी त्यांची एक वाईट बाजूही पाहिली आहे. मी त्यांची काळी बाजू पाहिली आहे. आपल्या सर्वांमध्ये एक काळी बाजू असते जी आपण बाजूला ठेवतो, अशी त्यांची बाजू आहे.’
दरम्यान, नाना पाटेकर यांनी ‘वेलकम‘, ‘क्रांतिवीर‘, ‘नटसम्राट‘, ‘परिंदा‘ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.