AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप रडले, वेदना इतक्या तीव्र की..; सर्जरीनंतर दीपिकाची झाली अशी अवस्था

'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिच्या प्रकृतीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

खूप रडले, वेदना इतक्या तीव्र की..; सर्जरीनंतर दीपिकाची झाली अशी अवस्था
Dipika KakarImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 11:16 AM
Share

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर एकानंतर एक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्यावर लिव्हर कॅन्सरीची सर्जरी झाली होती. त्यातून हळूहळू बरी होत असतानाच आता दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले. अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही टेस्ट केल्या. त्यात पोटात 1.3 सेंटिमीटरचं सिस्ट असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी लगेचच तिला दाखल होऊन सर्जरी करावी लागणार असल्याचं सांगितलं होतं. नुकतीच दीपिकावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून तिची प्रकृती सुधारतेय. आधी दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या आरोग्याविषयीची माहिती दिली. त्यानंतर आता दीपिकाने तिच्या युट्यूब चॅनलवर नवीन व्लॉग पोस्ट केला आहे. या व्लॉगमध्ये तिने रुग्णालयातून घरी परतल्याचं सांगितलं आहे,

दीपिकाने या व्लॉगमध्ये सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. पोटात सिस्ट झाल्याचं कळताच ती खूप चिंतेत होती. त्याचदरम्यान तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. पती शोएबसोबत ती हा लग्नाचा वाढदिवस साजरा करू शकली नव्हती. “संपूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पडली. सर्वांना वाटत होतं की पुन्हा कॅन्सर झाला की काय, परंतु तसं काहीच नाही. सर्वकाही अत्यंत जलदगतीने झालं. डॉक्टर म्हणाले की लगेच दाखल हो, त्याचदरम्यान आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे सर्वकाही समजण्यात थोडा वेळ लागला. सर्वांची हिंमत सोबत असली की वेळ निघून जाते. मी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना खूप घाबरले होते. मी खूप रडले, परंतु डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं. माझ्या पोटातील सिस्टचा आकार लहान असल्याने ऑपरेशन सहजरित्या झालं. जर आकार मोठा असता तर शस्त्रक्रिया आणखी कठीण असती”, असं दीपिका म्हणाली.

या व्लॉगमध्ये दीपिकाने अल्लाहचे आभार मानले. याविषयी तिने पुढे सांगितलं, “सुदैवाने योग्य वेळी सिस्टचं निदान झाल्याने उपचार पटकन झाले. सर्जरीनंतर मला फार वेदना जाणवत होत्या. पोटातील सिस्ट जाळून नष्ट करण्यात आलं होतं, त्यामुळे या वेदना खूप वेगळ्या होत्या. सध्या हालचाली करतानाही वेदना होत आहेत. सर्जरीनंतर अर्धा तास मला प्रचंड दुखत होतं. माझ्या आरोग्यासाठी ज्या चाहत्यांनी प्रार्थना केल्या, त्यांचे मी आभार मानते.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...