AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipika Kakar Health Update: लिव्हर कॅन्सरनंतर पोटात सिस्ट, दीपिकावर पुन्हा सर्जरी; पतीने दिले हेल्थ अपडेट

लिव्हर कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पोटात 1.3 सेंटिमीटरच्या सिस्टचं निदान झालं. पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने दीपिका तपासणीसाठी गेली असता तिच्या पोटात सिस्ट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Dipika Kakar Health Update: लिव्हर कॅन्सरनंतर पोटात सिस्ट, दीपिकावर पुन्हा सर्जरी; पतीने दिले हेल्थ अपडेट
Dipika Kakar and Shoaib Ibrahim Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 8:25 AM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर पुन्हा एकदा आरोग्याच्या समस्यांचा सामना करतेय. काही महिन्यांपूर्वीच तिने लिव्हर कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तेव्हा काही चाचण्यांनंतर दीपिकाच्या पोटात सिस्ट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दीपिकाच्या पोटात 1.3 सेंटिमीटरचा सिस्ट आढळला होता आणि आता शस्त्रक्रिया करून हे सिस्ट काढण्यात आले आहेत. मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तिच्या आरोग्याबद्दलची माहिती दिली.

शोएबने लिहिलं, ‘अल्लाहच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे दीपिकाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सर्वकाही ठीक आहे आणि तीसुद्धा आता ठीक आहे. फक्त थोड्या वेदना तिला जाणवत आहेत. परंतु चिंतेचं काही कारण नाही. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद.’ याआधी शुक्रवारी दीपिका आणि शोएबने व्लॉग पोस्ट करत चाहत्यांना या सर्जरीविषयीची माहिती दिली होती. तेव्हा दीपिकाने सांगितलं की पोटासोबतच तिचा खांदासुद्धा दुखत होता, त्यामुळे ती चिंचेत होती. सिस्टशिवाय इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं तिने स्पष्ट केलं. डिसेंबरमध्ये जेव्हा दीपिकाचा PET स्कॅन करण्यात आला, तेव्हासुद्धा रिपोर्ट्स नॉर्मलच होते.

शोएबची पोस्ट-

“दीपिकाला लिव्हर कॅन्सर झाल्यापासून एकच भीती असते की तिला पुन्हा कॅन्सर होऊ नये. डॉक्टरांनी पोटातील सिस्टवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणतीही मोठी शस्त्रक्रिया होणार नाही. छोट्याच्या प्रोसिजरने ते सिस्ट बर्न केले जातील. त्यासाठी दीपिकाला तीन ते चार दिवसांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. काल आम्ही व्लॉगमध्ये हसत होतो आणि आज आम्ही पुन्हा रुग्णालयात आहोत. हेच आयुष्य आहे. परंतु आम्ही अल्लाहचे आभार मानतो की सुरुवातीच्या स्टेजमध्येच आम्हाला सिस्टबद्दल समजलं,” असं शोएब व्लॉगमध्ये म्हणाला होता. यावेळी दीपिकासुद्धा खूप भावूक झाली होती. यावेळी तिने चाहत्यांनाही छोट्यातल्या छोट्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला दिला होता.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...