AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल

'डॉन 3'वरून सुरू असलेला वाद चांगलाच गाजला. हे पेटलेलं प्रकरण काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता अभिनेता रणीवर सिंहच्या वडिलांची या वादात एंट्री झाल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय घडलं ?

Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल
Don 3 Controversy
| Updated on: Aug 21, 2026 | 9:57 PM
Share

Don 3 Controversy : अभिनेता-दिग्दर्शक परहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात ‘डॉन 3’ चित्रपटावरून बिनसंल, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. रणवीरने हा चित्रपट सोडल्यानंतर फरहानच्या कंपनीने नुकसानभरपाई म्हणून त्याच्याकडून 45 कोटी रुपयांची मागणी केली होती. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने चित्रपट सोडला, असा आरोप फरहानतर्फे करण्यात आला होता. प्री-प्रॉडक्शनवर बराच खर्च झाला, त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्याने केली. मात्र पाहता पाहता हे प्रकरण चांगलंच पेटलं, वाद वाढतच गेला आणि हे प्रकरण फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) पर्यंत पोहोचलं. आता डॉ 3 चा वाद पुन्हा चर्चेत आलाय, त्याचं कारण म्हणजे या वादात रणवीर सिंहचे वडील जगजीत सिंह भवनानी यांची एंट्री झाली आहे.

मंगळवारी जगजीत सिंह भवनानी हे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स एसोसिएशन (IMPPA) च्या ऑफीसमध्ये पोहोचले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांनी IMPPA मध्ये एक्सेल एंटरटेनमेंटतर्फे करण्यात आलेल्या 45 कोटी रुपयांच्या मागणीविरोधात अर्ज दाखल केला आहे. या असोसिएशनची कायदेशीर टीम आधी या प्रकरणाची चौकशी करेल आणि त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, असं सांगण्यात येत आहे.

‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीरने घेतला निर्णय

खरंतर 2023 साली ‘डॉन 3’ चित्रपटाची घोषणा झाली होती, मात्र तेव्हा काम सुरू झालं नव्हतं, त्याला काही उशीर झाला. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार अशा चर्चा होत्या. मात्र, ‘धुरंधर’ चित्रपटाला मिळालेल्या तूफान यशानंतर रणवीर सिंहने ‘डॉन 3’मधून माघार घेतली. यामुळे फरहान अख्तरच्या कंपनीला आर्थिक नुकसान झालं, असं सांगण्यात आलं.

रणवीर सिंहवर बंदी

गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण बरंच चर्चेत होतं. फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने रणवीर सिंहविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) जारी केलं होतं. याच अर्थ असा की, या फेडरेशनचा कोणताही सदस्य रणवीरसोबत काम करू शकत नव्हता. त्यामुळे या निर्णयाकडे (रणवीरवर ) एकप्रकारची बंदी या दृष्टीने पाहिलं जात होतं. त्याच मुद्यावरून मोठा वादही निर्माण झाला. मात्र, नंतर फेडरेशनने हा निर्णय मागे घेतला. आता रणवीरच्या वडिलांची यात एंट्री झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

कामाबद्दल सांगायचं झालं तर रणवीर सिंह सध्या ‘प्रलय’ या आगामी झॉम्बी थ्रिलर चित्रपटामध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत याचं शूटिंग सुरू झालं. या चित्रपटात रणवीरसोबत कल्याणी प्रियदर्शन ही झळकणार आहे.

Follow Us
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...