Ekta Kapoor: ‘..तर आज मी या अभिनेत्याची पत्नी असते’; एकता कपूरकडून पहिल्यांदाच प्रेमाची जाहीर कबुली

सोशल मीडियावर अभिनेत्यासोबतचा फोटो पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Ekta Kapoor: ..तर आज मी या अभिनेत्याची पत्नी असते; एकता कपूरकडून पहिल्यांदाच प्रेमाची जाहीर कबुली
Ekta kapoor
| Updated on: Sep 30, 2022 | 1:33 PM

मुंबई- टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने (Ekta Kapoor) आपल्या प्रतिभेच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावलं. मात्र तिने आजवर लग्न का केलं नाही, अशा प्रश्न वारंवार चाहते उपस्थित करतात. आता एकताना पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबतचा (Bollywood Actor) फोटो पोस्ट करत तिने भावना व्यक्त केल्या. या अभिनेत्याशी एकताला लग्न (Marriage) करायचं होतं. त्याच्या वाढदिवसानिमित्त एकताने ही खास पोस्ट लिहिली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

एकता कपूरने ज्या अभिनेत्याबद्दल प्रेमाची जाहीर कबुली दिली, तो चंकी पांडे आहे. चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त एकताने हा फोटो पोस्ट केला आहे. चंकी पांडेसोबत लग्न करायचं होतं, मात्र ते शक्य होऊ शकलं नाही, असंही तिने लिहिलंय.

एकता कपूरची पोस्ट-

काही वर्षांपूर्वींचा हा दोघांचा फोटो आहे. ‘जेव्हा बऱ्याच वर्षांपूर्वी मी त्याला पाहून ब्लश (गालातल्या गालात लाजणं) केलं होतं. जर त्याने होकार दिला असता तर आज मीसुद्धा बॉलिवूड वाइफ असते’, अशी पोस्ट तिने लिहिली. यासोबतच तिने हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. चंकी पांडेची पत्नी भावना पांडे ही नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये झळकली होती. याच अनुषंगाने एकताने मस्करीत ‘बॉलिवूड वाइफ’ असा उल्लेख केला आहे.

चंकी पांडेने कॉस्च्युम डिझायनर भावना पांडेशी लग्न केलं. या दोघांना अनन्या पांडे ही मुलगी आहे. तर एकता कपूर ही सिंगल मदर आहे. सरोगसीद्वारे एकताने रवी या मुलाला जन्म दिला.