
हरियाणातील गुरुग्राम जिल्हा पोलिसांनी ५ शार्प शूटर्सचा एन्काऊंटर केला आहे. हे पाचही शूटर्स सिंगर फाजिलपुरियाला मारण्यासाठी आले होते. सांगायचे म्हणजे, सिंगर राहुल यादव उर्फ फाजिलपुरिया यांच्यावर १४ जुलै २०२५ रोजी हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील दक्षिण परिघीय रस्त्यावर (SPR) हल्ला झाला होता, ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. याच प्रकरणात आरोपींचा एन्काऊंटर गुरुग्राममध्ये झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सिंगर राहुल फाजिलपुरियाच्या हत्येचा कट रचणाऱ्या हल्लेखोरांना गुरुग्राम STF ने पकडले आहे. STF आणि क्राइम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत गुरुग्रामच्या वजीरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर ५ शार्प शूटर्सना अटक करण्यात आली आहे. ४ गुन्हेगारांच्या पायात गोळ्या लागल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका शूटरला पाठलाग करून पकडून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
गँगस्टर दीपक नांदलची माणसे
प्राथमिक तपासात असे समजले आहे की, हे पाचही शूटर्स परदेशात बसलेले गँगस्टर दीपक नांदल आणि रोहित सिरधानिया यांच्यासाठी काम करत होते. पाचही शूटर्सची ओळख हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील विनोद पहलवान, सोनीपत जिल्ह्यातील पदम उर्फ राजा, शुभम उर्फ काला, गौतम उर्फ गोगी आणि आशीष उर्फ आशु अशी झाली आहे. यापैकी ४ गुन्हेगारांना पायात गोळ्या मारून पकडण्यात आले आहे, तर एका शूटरला पाठलाग करून पकडले आहे.