‘ती देखील एक व्यक्ती आहे…’, ईशा देओल हिने महिलेसोबत असं काय केलं, ज्यामुळे संतापले नेटकरी

सामान्य महिलेने आशीर्वाद दिल्यानंतर ईशा देओल हिने केलेली गोष्ट कॅमेऱ्यात कैद... व्हिडीओ पाहाताच संतापले नेटकरी.. अभिनेत्रीच्या त्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

ती देखील एक व्यक्ती आहे..., ईशा देओल हिने महिलेसोबत असं काय केलं, ज्यामुळे संतापले नेटकरी
ईशा देओल
| Updated on: Feb 01, 2023 | 9:23 AM

Esha Deol Trolled : अभिनेत्री ईशा देओल बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. ईशाला पाहिल्यानंतर अभिनेत्रीला भेटण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. पण आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. ईशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ईशा तिच्या कारमध्ये बसली आहे आणि तिला भेटण्यासाठी काही चाहत्यांनी अभिनेत्रीच्या कार शेजारी गर्दी केल्याचं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

व्हिडीओमध्ये एक महिला ईशाच्या कार शेजारी येते आणि अभिनेत्रीला आशीर्वाद देवून तिच्यासोबत फोटो काढते. त्यानंतर अन्य एक महिला येते. ती देखील ईशाला आशीर्वाद देते आणि फोटो काढते. पण जेव्हा ईशासोबत हात मिळवण्यासाठी हात पुढे करते तेव्हा ईशा कारच्या काचा लावून घेते. सध्या ईशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सामान्य माहिलेसोबत केलेल्या या वागणुकीमुळे अभिनेत्रीवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एक युजर व्हिडीओवर संताप व्यक्त करत म्हणाला,’ती महिला देखील एक व्यक्ती आहे…’ तर दुसरा युजर म्हणाला, ‘कार मधून खाली उतरु शकली असती…’ ईशाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीचा विरोध केला आहे.

 

 

ईशाच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा एकही सिनेमा मोठ्या पडद्यावर खास कामगिरी करु शकलेला नाही. पण ईशा अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी असल्यामुळे कायम चर्चत असते. एककाळ असा होता जेव्हा रुपेरी पडद्यावर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र राज्य करत होते. पण त्यांच्या मुलांना बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही.

ईशा देओल हिने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ईशा ‘न तुम जानो न हम’ सिनेमात अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत झळकली. एवढंच नाही तर, सिनेमाने बॉलिवूड शिवाय अनेक तामिळ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

ईशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.