AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं

'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa) या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर चाहते आता 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं
| Updated on: Jan 18, 2021 | 4:52 PM
Share

मुंबई : ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa) या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर चाहते आता ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि तब्बू (Tabu) महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बू या चित्रपटातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तब्बूची भूल भुलैया 2 ची शूटिंग डेट जानेवारीच्या शेवटी निश्चित केली गेली होती, परंतु तब्बू त्या काळात व्यस्त आहे. (Exit Taboo from Bhool Bhulaiyaa 2?)

View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

चित्रपटाचे शूटिंग मार्च 2020 मध्ये सुरू होणार होते पण कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग करता आले नाही. त्यानंतर ऑक्टोबर 2020 ची तारीख निश्चित केली पण नंतर डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरमध्येही सुरू होऊ शकले नाही आणि आता निर्मात्यांनी जानेवारीच्या शेवटी ही तारीख निश्चित केली आहे. मात्र, यावेळी तब्बू व्यस्त आहे. लभुलैया 2 हा चित्रपट अनीम बज्मी यांनी दिग्दर्शित केला आहे. भूषण कुमार मुराद खेतानी आणि कृष्णा कुमार हे तिघे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2007 मध्ये रिलीज झालेला ‘भूलभुलैया’ (Bhool Bhulaiyaa) चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तब्बल 13 वर्षांनी भूलभुलैया चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूलभुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

भूलभुलैया 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला. पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतीमध्ये असलेला कार्तिक आर्यन हुबेहुब अक्षय कुमारप्रमाणे दिसत होता. तसेच भूलभुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमारप्रमाणे दिसत आहे. कार्तिकने अक्षयप्रमाणे रुद्राक्षाच्या माळाही घातल्या होत्या. त्यासोबतच अक्षयप्रमाणे त्याने डोक्यावर पिवळा कपडाही गुंडाळला आहे.

संबंधित बातम्या : 

Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

Big News : करण जोहरच्या ‘LIGER’चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

Big Announcement | करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा!

(Exit Taboo from Bhool Bhulaiyaa 2?)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.