Big News : करण जोहरच्या ‘LIGER’चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

करण जोहरच्या 'LIGER' या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(Vijay Devarakonda's debut in Bollywood with Karan Johar's 'LIGER', see the first look of the film)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:43 PM, 18 Jan 2021
Big News : करण जोहरच्या 'LIGER'चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्टसह परत आला असून, त्यानं नवीन ‘LIGER’ हा चित्रपट घोषित केला आहे. चित्रपटाच्या शीर्षकानंतर त्यानं चित्रपटाचा पहिला लुकही चाहत्यांसाठी शेअर केला. या चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विजयसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या चित्रपटाचे शीर्षक आणि पहिला लुक शेअर करताना करण जोहरनं लिहिलं – ‘विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे – तुमच्यासमोर LIGER ची घोषणा करताना मला खूप अभिमान वाटतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन उत्तम दिग्दर्शक पुरी जगन्नाथ करत आहेत. ही कथा हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये येणार आहे. #liger #SaalaCrossBreed’

या चित्रपटात विजय देवरकोंडा पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. अलीकडेच विजय थायलंडला गेला होता तिथं त्यानं मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलंय. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय राम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करत असून करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाची एकत्र निर्मिती करत आहेत.

रविवारी करण जोहरनं आपल्या एका पोस्टमध्ये सांगितलं की त्यांचा हा प्रोजेक्ट भाषेतील अडथळे दूर करणार आणि नवीन काळातील सिनेमा पुढे आणेल.
करण जोहरचा प्रभाव साऊथच्या चित्रपटांमध्येही वेगानं वाढत आहे. त्यांनी लाइका कंपनीबरोबर 5 चित्रपटांसाठी करार केला आहे. ज्या कंपनीनं 2.0 सारखा महागडा चित्रपट बनवला. साहजिकच यासाठी करणला खूप पैशांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत, तो अशा व्यक्तिच्या शोधात आहे जो त्याच्या कंपनीमध्ये पैसा टाकेल.

संबंधित बातम्या 

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

Big Announcement | करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा!