दोन पत्नी आणि चार लेकर, अरमान मलिक याला मोठा धक्का, थेट…

अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेताच अरमानने दुसरे लग्न केले. दोन्ही पत्नींसोबत अरमान बिग बॉसच्या घरात देखील दाखल झाला होता.

दोन पत्नी आणि चार लेकर, अरमान मलिक याला मोठा धक्का, थेट...
Armaan Malik
| Updated on: Oct 18, 2024 | 1:21 PM

यूट्यूबर अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिकची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर लोकांनी जोरदार टीका अरमान मलिक याच्यावर केली. दोन्ही पत्नींसोबत अरमानला बिग बॉसच्या घरात प्रवेश दिल्यानंतर लोकांनी जोरदार टीका बिग बॉसच्या निर्मात्यांवर केली. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही फिनाले वीकपर्यंत गेली होती. धमाकेदार गेम खेळताना कृतिका दिसली. अरमान, कृतिका आणि पायल मलिक हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. 

अरमान मलिक याच्या गाडीचा मोठा अपघात झालाय. या अपघातामधून ते थोड्यात बचावल्याचे बघायला मिळतंय. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कृतिका अरमान मलिक आणि मागच्या गाडीमध्ये पायल मलिक ही होती. मात्र, अरमान आणि कृतिका हे ज्या गाडीतून जात होते त्या गाडीचा मोठा अपघात झालाय. 

दरीमध्ये गाडी जाण्यापासून आपण थोड्यात वाचल्याचे सांगताना अरमान मलिक हा दिसतोय. यासोबतच गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे. यावेळी कृतिका ही अरमानच्यासोबत आहे. मागच्या गाडीतून बाकी त्यांची लेकरं आणि पायल मलिक येत होते. यावेळी कृतिकाचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय. 

कृतिका आणि अरमान मलिक हे या अपघातानंतर चांगलेच घाबरल्याचे त्यांच्या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. अरमान मलिक म्हणाला की, आमचे नशीब चांगले म्हणावे लागेल आम्ही थोड्यात वाचलो नाही तर आमची गाडी थेट दरीमध्येच जाणार होती. लोक मलिक कुटुंबाला काळजी घेण्याच्या सल्ला देताना दिसत आहेत. 

काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने स्पष्ट म्हटले की, आमची 200 कोटीची संपत्ती आहे. अरमान याने पायल मलिक हिच्यासोबत घटस्फोट न घेताच थेट कृतिका हिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर किती जास्त समस्यांना तोंड दिले हे सांगताना अनेकदा बिग बॉसच्या घरात अरमान मलिक हा दिसला.