पोलिसांचा खबरीच निघाला सराईत गुन्हेगार, ‘Bigg Boss’ फेम अभिनेत्रीचा घरावर डल्ला, मोठं प्रकरण समोर येताच खळबळ

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीचा घरावर डल्ला टाकल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली, पण तोच सराईत गुन्हेगार असल्याचं कळताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. त्याच्याकडून तब्बल 76.39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे... तर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

पोलिसांचा खबरीच निघाला सराईत गुन्हेगार, Bigg Boss फेम अभिनेत्रीचा घरावर डल्ला, मोठं प्रकरण समोर येताच खळबळ
Mumbai Police
| Updated on: Aug 12, 2026 | 9:07 AM

पोलीस त्यांच्या खबऱ्यांवर विश्वास ठेवत प्रकरणाच्या मूळापर्यंत पोहोचतात. पोलिसांचे खबरी देखील अनेक गुन्हे आणि लोकांवर बारीक लक्ष ठेवतात. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, ज्या खबऱ्याने घरफोडीचे एक प्रकरण उघडकीस आणण्यास मदत केली होती. त्यानेच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरावर डल्ला टाकला आणि तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बिग बॉस फेम अभिनेत्री आणि मॉडेल लोपामुद्रा राऊतच्या सांताक्रूझ येथील फ्लॅटमध्ये 1 कोटी रुपयांच्या कथित चोरी प्रकरणी माजी पोलीस खबऱ्याला अटक करण्यात आली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्याच्या एका माजी खबऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पाळत ठेवून आरोपीचा बिहारमध्ये शोध घेतला आणि 76.39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर यामध्ये खबऱ्याच्या काकांचा हात असल्याचं देखील कळत आहे. तर चोरीच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी त्याचा काका फरार आहे.

खबऱ्याबद्दस सांगायचं झालं तर, हा आरोपी एकेकाळी पोलीस खबरी म्हणून काम करत होता. 2012 मध्ये गावदेवी पोलिसांना घरफोडीचे एक प्रकरण उघडकीस आणण्यास त्याने मदत केली होती. आरोपी चंदन मुखिया याला 2 ऑगस्ट रोजी बिहारमधील दरभंगा येथील त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आली आणि 8 ऑगस्ट रोजी मुंबईत आणण्यात आले. सध्या याप्रकरणी अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

चोरी प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, चंदन याने अभिनेत्रीच्या घरी तेव्हा चोरी केली, जेव्हा ती 20 ते 27 जुलै रोजी शहराबाहेर होती. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातून सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्किट आणि रोकड देखील जप्त केली. अशात सांताक्रूझ पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन करत प्रकरण मार्गी लावलं. तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि आरोपी बिहार येथे असल्याचं कळलं…

76 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरातून तब्बल 76 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी जप्त केली आहे. आरोपी अद्यापही पोलीस कोठडीत असून, त्याची अद्यापही चौकशी सुरुच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन कमलेश मुखिया याने जुलैमध्ये अभिनेत्री राऊत हिच्या घराची रेकी केलेल आणि जेव्हा त्याला कळलं की, अभिनेत्री घरी नाहीये तेव्हा त्याने चोरी केली. त्यानंतर ट्रेनने बिहार येथे परतला.

तपासादरम्यान पोलिसांना असंही आढळून आलं की, आरोपीने चोरीच्या पैशांचा वापर करून आपल्या बहिणीच्या नावे जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. चोरी केल्यानंतर 10 दिवसांत आरोपी चंदन आणि त्याचे काका लालू मुखिया यांनी 22 लाख रुपये जमिनीत गुंतवलेले. तर लालू मुखिया फरार असून याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us