Gadar 2 Video Leak : सनी देओल आणि अमीषा पटेलचा शूटिंगमधील तो व्हिडीओ व्हायरल!

तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेल ही प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gadar 2 Video Leak : सनी देओल आणि अमीषा पटेलचा शूटिंगमधील तो व्हिडीओ व्हायरल!
| Updated on: Jun 07, 2023 | 10:57 PM

मुंबई : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा ‘गदरः एक प्रेम कथा’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. तसंच या चित्रपटाच्या दुसर्‍या पार्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता प्रेक्षकांसाठी खुशखबर असून लवकरच या चित्रपटाचा दुसरा पार्ट भेटीस येणार आहे. तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेल ही प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

या चित्रपटातून तारा सिंग आणि सकीनाची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. तसंच नुकताच सनी देओल आणि अमिषा पटेलचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ते गुरूद्वाराच्या आवारात त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करताना दिसत आहेत.

या व्हिडीओत सनी देओल आणि अमिषा पटेल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून चित्रपटातील रोमँटिक गाण्याचं शूटिंग सुरू असल्याचं दिसतंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसंच हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील सनी देओलचा फर्स्ट लूक समोर आले होता, ज्यात तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे. सनीचा या फर्स्ट लूकला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे