Gautami Patil : माझ्या जवळच्या माणसांनी…’त्या’ व्हायरल व्हिडिओवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; सांगितला धक्कादायक अनुभव
Gautami Patil : गौतमी पाटीलचे दोन व्हिडिओ व्हायरल झालेले. त्यावर आता गौतमीनं प्रतिक्रिया दिली असून धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

गौतमी पाटील कायम तिच्या नृत्यामुळे चर्चेत असते. अनेकदा गौतमीला ट्रोल केलं जातं. काही वर्षांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला. त्यानंतर एका कार्यक्रमातील विचित्र डान्स स्टेप करतानाचाही तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत गौतमीनं हा व्हायरल व्हिडिओवर, ट्रॉलींगवर भाष्य केलं आहे. तसंच तिनं आयुष्यातील कठीण काळही सांगितला आहे. गौतमी म्हणाली की,’जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या अनुभवांवरून शिकतो. मी अनेक गोष्टी बघून शिकले. मला एका व्हिडिओवरून ट्रोल करण्यात आलं. माझ्याही पेक्षा वाईट स्टेप्स करणाऱ्याही मुली तेव्हा होत्या, मी दिसले आणि व्हिडिओ उचलला गेला. मी त्या व्हिडिओ बाबत माफीही मागितली आणि माझ्यात सुधारणाही केली. तरीही मी ट्रोल होत गेले.’
व्हायरल व्हिडिओवर गौतमीची प्रतिक्रिया
‘माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला जो व्हायला नको होता. ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याच्या घरातही मुलगी असेल त्याची आई किंवा बहीण असेल त्याला लाज नाही म्हणून त्याने ते केलं. एका मुलीचा व्हिडिओ त्यानं व्हायरल केला. प्रत्येकाची वेळ येते, त्यामुळे तो जो कुणी असेल त्याला त्याची शिक्षा होईल. पण तो क्षण असा होता की मला हे वाटून गेलं की आता मी कार्यक्रम थांबवले पाहिजे, मी ट्रोल झाले.’
‘लावणीतला व्हिडिओ व्हायरल झाला तरीही काही वाटलं नाही. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मला वाटलं मी थांबले पाहिजे. पण, माझ्या जवळच्या माणसांनी मला पाठिंबा दिला. त्या व्हिडिओनंतर मी पहिला शो जेव्हा केला होता तेव्हा, लोक काय म्हणतील या विचाराने मी घाबरले होते. तेव्हा माझा सगळा ग्रुप मला स्टेज पर्यंत सोडायला आला होता. त्या शोमध्ये प्रेक्षकांचा उत्साह पाहिला तेव्हा मला जाणवलं की, प्रेक्षकांचं प्रेम आहे तर मी का थांबावं म्हणून मी थांबले नाही. गाडीचा विषय झाला त्यातही मला मुद्दाम गोवण्यात आलं, पण मी थांबले नाही
‘माझे वडील रोज ड्रिंक करायचे, आईलाही मारायचे. माझ्यावरही संशय घेत होते. माझ्या आईने त्या काळात कंपनीत काम केलं. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली तेव्हा मी लगेच ऍम्ब्युलन्स बोलावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं. त्यावेळीही मला ट्रोल करण्यात आलं, वडील वारले आणि लगेच गौतमी पाटीलनं शो केला. पण, जे शो ऑर्गनाइज करतात त्यांचेही पैसे लागलेले असतात.’ असं गौतमी शेवटी म्हणाली. ‘ग्रो मोशन‘ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील बोलत होती.