गौतमी पाटीलने ‘त्या’ मुलाला नाचता नाचता असं उचलून घेतलं, तो नशिबवान …

सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच नावाची चर्चा आहे. ती म्हणजे डान्सर गौतमी पाटीलची

गौतमी पाटीलने त्या मुलाला नाचता नाचता असं उचलून घेतलं, तो नशिबवान ...
| Updated on: Jan 03, 2023 | 5:07 PM

Gautami Patil Viral Video : सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे (Gautami Patil ) डान्स आणि लावणीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. सध्या गौतमी पाटीलचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गौतमी पाटीलने एका लहान मुलाला डान्स करताना स्टेजवर बोलावून त्याच्या सोबत डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने त्या मुलाला मांडीवर घेऊन त्याला किस केलं आहे. याच लहान मुलासोबत डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

गौतमी पाटीलचा लहान मुलासोबतचा व्हिडीओ व्हायरल?

सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या डान्सची खूप चर्चा आहे. गौतमी पाटील ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. या वेळी गौतमीने पुण्यातील एका कार्यक्रमात एका लहान मुलाला आपल्या मांडीवर बसवून त्याच्यासोबत डान्स केला आहे. या दोघांचा डान्सचा करतानाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

गौतमीच्या कार्यक्रमांना गर्दी का असते?

गौतमी पाटीलने काही दिवसांपुर्वी आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव, स्टेप्स करत डान्स केला होता. ज्याचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होऊ लागली. मराठी कलाकारांनी देखील तिच्या या डान्सवर नाराजी व्यक्त केली होती. तिच्या या अश्लील स्टेप्स आणि हावभावामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळेच आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होत आहे. ज्यामध्ये तिचा डान्स पाहण्यासाठी काहीजण तर झाडावर आणि शाळेवर देखील चढले होते.