
मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री जिनिलिया डिसूझा – देशमुख (Genelia Deshmukh) आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे कायम एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या जिनिलिया आणि रितेश यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या जोडीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिनिलिया आणि रितेश यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर जिनिलिया प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
शनिवारी रितेश आणि जिनिलिया एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात दोघेही खूप क्यूट दिसत होते. रितेश निळ्या रंगाच्या पँटसह पांढऱ्या शर्टमध्ये दिसला, तर जेनेलिया हिने जांभळ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस घातला होता. दोघे एकत्र फार सुंदर दिसत आहेत. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रितेश आणि जिनिलिया यांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या आहेत. जिनिलिया हिने पोटावर हात ठेवून कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यामुळे अभिनेत्री तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण व्हायरल व्हिडीओबद्दल अभिनेत्री कोणताही खुलासा केलेला नाही.
रितेश आणि जिनिलिया यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतक २०१२ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर २०१४ मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी रियान याचं जगात स्वागत केलं. त्यानंतर २०१६ मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी दुसरा मुलगा राहिल याला जन्म दिला. आता जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.
रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. दोघांचे रिल्स चाहत्यांना प्रचंड आवडतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रितेश आणि जिनिलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.