Sunita Ahuja On Govinda : गोविंदा नवरा म्हणून नकोच… सुनीता आहुजाच्या धक्कादायक विधानाने बॉलिवूड हादरले, पुन्हा संसारात वादळ?

Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूड स्टार, अभिनेता गोविंदा याची पत्वी सुनिता अहुजाचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. तिच्या या विधानामुळे दोघांचं वैवाहिक नात, मतभेद यांच्याबद्दलच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. असं नेमकं काय म्हणाली सुनिता अहुजा ?

Sunita Ahuja On Govinda : गोविंदा नवरा म्हणून नकोच... सुनीता आहुजाच्या धक्कादायक विधानाने बॉलिवूड हादरले, पुन्हा संसारात वादळ?
गोविंदा आणि सुनिता अहुजा
Image Credit source: social media
| Updated on: Apr 28, 2026 | 12:17 PM

Sunita Ahuja On Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर 1, अभिनेता गोविंदा याचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. पण यावेळी तो त्याचं कमबॅककिंवा चित्रपटांमुळे नव्हे तर त्याच पत्नी सुनिता अहुजा यहिच्या बेधडक विधानामुळे स्पॉटलाइटमध्ये आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, सुनीताने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. यापूर्वीही ती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेकदा बोलली आहे. गोविंदासारखा मुलगा हवा पण त्याच्यासारखा पती नको असंही ती म्हणाली होती. मात्र या विधानामागचं कारण तिने आता स्पष्ट केलं आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

गोविंदा हे बॉलिवूडमधील अभिनेत्यांपैकी एक मोठं नाव आहे, त्याने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन त्याचा काळ गाजवला. मात्र त्याच्या व्यावसायिक जीवनासोबतच त्याचं पर्सनल लाईफदेखील, अनेकदा चर्चेत राहिलं आहे. यापैकी, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने केलेली वक्तव्ये सर्वाधिक चर्चित ठरली आहेत, ज्यामुळे कधीकधी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. सध्या, सुनीता आहुजा हिच्या अलीकडील मुलाखतीमुळे त्या दोघांच्या नात्याबद्दलची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

काय म्हणाली सुनिता अहुजा ?

अलीकडेच एका मुलाखतीत सुनिता अहुजाने, स्वतःबद्दल आणि गोविंदाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, गोविंदा एक मुलगा आणि भाऊ म्हणून एक उत्तम व्यक्ती होता, पण एक पती म्हणून तो माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. पुढे तिने स्पष्ट केलं की, तिला प्रवास करणं, बाहेर जेवायला जाणं आणि सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणं, असं सगळं आवडायचं, पण दुसरीकडे गोविंदाने त्याचं संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात घालवलं. एवढा मोठा सुपरस्टार असूनही गोविंदा कधीच स्वत:साठी आयुष्य जगला नाही आणि याचच मला वाईट वाटतं, असं सुनिता अहुजाने नमूद केलं.

पश्चातापाचा काहीच फायदा नाही

सुनीता अहुजा म्हणाली की, इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही. तिने स्पष्टपणे सांगितलं की, ती आता त्याला सोडू शकत नाही आणि आता तसा विचार करणेही चुकीचे ठरेल. “आता पश्चात्ताप करून काय फायदा? मी त्याला आता सोडू शकत नाही, नाही का? आता तर 40 वर्ष झाली, असा विचार करणंही गुन्हा होईल, ” असं ती पुढे म्हणाली. चार दशकांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच चढ-उतार आले, पण (आम्ही) दोघांनी एकत्र राहून सगळं निभावलं, असंही तिने नमूद केलं.

पर्सनल आयुष्याबद्दल चर्चा

1987 साली गोविंदा आणि सुनिता आहुजा यांनी लग्न केलं आणि सुरुवातीला त्यांनी आपले नाते खाजगी ठेवलं होतं. त्यांची मुलगी टीनाच्या जन्मानंतर त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा केली. आज या जोडप्याला दोन मुले आहेत आणि ते बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. मात्र, सुनिताने अधूनमधून त्यांच्या नात्याबद्दल काही अशी वक्तव्यं केली आहेत, ज्यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत आलं आहे.

Follow Us