Govinda: गोविंदा-कोमलची जवळीक वाढताच सुनीता अहुजानं उचललं मोठं पाऊल, देवाच्या दारी पोहोचली अन्…, Video Viral

Sunita Ahuja: सुनीता अहुजाने आता गोविंदा आणि कोमलची वाढती जवळीक पाहता एक मोठं पाऊल उचललं आहे, थेट देवाकडे साकडं मोठी मागणी केली आहे.

Govinda: गोविंदा-कोमलची जवळीक वाढताच सुनीता अहुजानं उचललं मोठं पाऊल, देवाच्या दारी पोहोचली अन्..., Video Viral
| Updated on: Sep 26, 2026 | 8:57 AM

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचे आयुष्य गेल्या काही काळापासून सार्वजनिक चर्चेचा विषय बनले आहे. जेव्हा गोविंदा सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत विविध ठिकाणी दिसला, तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी असल्याच्या अफवा सुरू झाल्या. अलीकडेच, ते दोघे लालबागच्या राजाच्या दर्शनाला एकत्र दिसले, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. आता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा आता कोलकाता येथील दक्षिणेश्वर काली मंदिरात गेली असून देवीला काय साकड घातलं हे बोलून दाखवलं आहे.

सुनीता अहुजा काय म्हणाली?

अलीकडेच, सुनीता आहुजा यांनी कोलकाता येथील दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिली आणि ती म्हणाली की, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी देवी कालीची प्रार्थना करायला आली होती, माझ्या आयुष्यातही काही राक्षस आहेत आणि मी देवीला त्यांचाही नाश करण्याची विनंती करण्यासाठी आले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व समस्या आणि अडथळे दूर व्हावेत अशी माझी इच्छा आहे.”

सुनीताने Gen Z आणि महिलांनाही तिला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ती म्हणाली, “तुमच्या मुलीला किंवा सुनेला अशा परिस्थितीतून जावे लागले तर तुम्ही काय कराल? मला सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे, Gen Z आणि महिलांनो, कृपया मला पाठिंबा द्या. माझ्यासोबत जे घडत आहे ते चांगले नाही. माझे घर विनाकारण उद्ध्वस्त होत आहे. सर्व महिलांनी, सर्व मुलांनी माझ्या पाठीशी उभे राहावे अशी माझी इच्छा आहे. माध्यमांनानही मला पाठिंबा द्यावा.”

सुनीता म्हणाली, “माझे घर उद्ध्वस्त करणाऱ्याचे मातृदेवीने रक्षण करावे, अशी मागणी करण्यासाठी मी येथे आले आहे. मातृदेवी राक्षसांचा नाश करणारी आहे आणि माझ्या आयुष्यातून हे संकट दूर व्हावे अशी माझी इच्छा आहे.” गोविंदा आणि कथित गर्लफ्रेंड कोमल नुकतेच त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यांचा रुपा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us