AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?

अभिनेत्री हंसिका मोटवानीने मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. टीव्ही अभिनेत्री आणि पूर्व जाऊबाई मुस्कान नॅन्सी जेम्सविरोधात तिने हा खटला दाखल केला असून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं 'सी-ग्रेड अभिनेत्री'; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
हंसिका मोटवानी, मुस्कान नॅन्सी जेम्सImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 9:03 AM
Share

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे हंसिकाने तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे, तर दुसरीकडे तिने पूर्व वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री मुस्कान नॅन्सी जेम्सविरोधात मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. मुस्कानने सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, हंसिकाने या याचिकेत केला आहे. त्याचसोबत तिने दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही केली आहे. इतकंच नव्हे तर मुस्कानने माझी जाहीर माफी मागावी, असंही हंसिकाने म्हटलंय.

वहिनीविरोधात मानहानीचा खटला

हंसिका मोटवानीने वकील अदनान शेख यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. हंसिकाने म्हटलंय की, तिचा भाऊ आणि मुस्कानची भेट एका ऑनलाइन अॅपद्वारे झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या लग्नाच्या खर्चासाठी मुस्कानने 27 लाख रुपये उधार घेतले होते, असाही तिच्यावर आरोप आहे. अनेकदा विचारूनही मुस्कानने ही रक्कम परत केली नसल्याचा दावा हंसिकाने केला आहे. या याचिकेत असंही म्हटलंय की जेव्हा मुस्कान आणि तिच्या पतीच्या नात्यात कटुता निर्माण झाली, तेव्हा त्याबद्दलची माहिती हंसिकाला नव्हती. कारण ती त्यांच्यासोबत राहत नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwanni (@ihansika)

वहिनीचा ‘सी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून उल्लेख

हंसिकाच्या याचिकेत मुस्कान नॅन्सी जेम्सच्या करिअर आणि लाइफस्टाइलबद्दल बरीच टीका करण्यात आली आहे. “छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम करणारी सी-ग्रेड अभिनेत्री”, असा नॅन्सीचा उल्लेख हंसिकाने याचिकेत केला आहे. मुस्कान सोशल मीडियावर महागडे बॅग्स आणि परदेशी ट्रिप्सचे फोटो पोस्ट करायची, परंतु जेव्हा 27 लाख रुपयांचं कर्ज फेडण्याची गोष्ट यायची, तेव्हा मात्र ती थेट नकार द्यायची. हे कर्ज फेडावं लागू नये म्हणून मुस्कानने सोशल मीडियावर हंसिकाबद्दल अपमानास्पद आणि खोट्या गोष्टी पसरवू लागली, असंही याचिकेत म्हटलंय.

हा वाद केवळ पैशांपुरता मर्यादित नाही. तर मुस्कानने पती (हंसिकाचा भाऊ) आणि हंसिकाविरोधात छळाचे आरोप करत एफआयआर दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना हंसिकाने स्पष्ट केलं की, तिचे तिच्या वहिनीसोबत काहीच संबंध नव्हते आणि त्यामुळे तिच्यावरील छळाचे आरोप निराधार आहेत. हा एफआयआर रद्द करण्यासाठी हंसिकाने मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...