AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis on Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..

गणपती बाप्पांच्या दर्शनासोबत मुख्यमंत्र्यांची भेट आणि मिळालेल्या शुभेच्छांमुळे ‘हनुमान अंश’च्या टीमसाठी हा प्रसंग संस्मरणीय ठरला आहे. बॉक्स ऑफिसवरील यशानंतर मिळालेलं हे कौतुक चित्रपटाच्या प्रवासातील आणखी एक चर्चेचा टप्पा ठरलं आहे.

Devendra Fadnavis on Hanuman Ansh: 'हनुमान अंश'ची टीम थेट 'वर्षा'वर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..
हनुमान अंश चित्रपटाच्या टीमने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2026 | 10:31 AM
Share

Devendra Fadnavis on Hanuman Ansh: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीला फारशी हवा नसलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे दमदार कामगिरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी आणि संपूर्ण टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’ इथं भेट घेतली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत टीमने गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डॉ. विशाल चतुर्वेदी आणि त्यांच्या टीमच्या कामाचं कौतुक केलं. ‘हनुमान अंश’च्या टीमचं ‘वर्षा’वर स्वागत करताना आनंद झाला, असं त्यांनी नमूद केलं. तसंच गणपती बाप्पांचं आशीर्वाद घेतल्यानंतर विशाल चतुर्वेदी आणि टीमचं त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी अभिनंदन केलं आणि आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

फडणवीसांचं ट्विट-

बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान अंश’ची दमदार वाटचाल

‘हनुमान अंश’ हा अध्यात्मिक चित्रपट असून तो नीम करोली बाबा यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 7 ऑगस्ट 2026 ला चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई मर्यादित होती; मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे चित्रपटाने हळूहळू वेग पकडला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सातत्याने वाढत गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ‘हनुमान अंश’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमसाठी मुख्यमंत्र्यांची भेट अशा यशाच्या काळात विशेष ठरली आहे. कमी गाजावाजा करत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर मोठा पल्ला गाठला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेलं कौतुक दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी आणि त्यांच्या टीमसाठी महत्त्वाचा क्षण ठरला आहे. ‘हनुमान अंश’च्या यशानंतर चतुर्वेदी आता पुढील प्रकल्पांवरही काम करत आहेत. त्यांच्या पुढील चित्रपटांपैकी एक प्रकल्प गोस्वामी तुलसीदास यांच्या जीवनावर आधारित असल्याचं समोर आलं आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय