HanuMan Teaser: साऊथ पुन्हा एकदा बॉलिवूडवर पडणार भारी! ‘हनुमान’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा; राम-रामच्या जपाने जिंकलं मन

| Updated on: Nov 22, 2022 | 12:10 PM

'हनुमान'च्या टीझरने हिंदी सिनेसृष्टीत घातला धुमाकूळ; नेटकरी म्हणाले 'आदिपुरुषपेक्षा 1000 पटींनी चांगला'

HanuMan Teaser: साऊथ पुन्हा एकदा बॉलिवूडवर पडणार भारी! हनुमानचा टीझर पाहून अंगावर येईल काटा; राम-रामच्या जपाने जिंकलं मन
Hanuman teaser
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई: ‘हनुमान’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या टीझरने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सायन्स फिक्शन, डिटेक्टिव्ह, झोंबी यांसारखे विषय उत्तमरित्या हाताळण्यासाठी ते ओळखले जातात. सर्वसामान्य बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान’ या चित्रपटाच्या टीझरमधील जबरदस्त सीन आणि व्हिएफएक्स पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. अनेकांनी या टीझरची तुलना ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरशी केली आहे.

‘हनुमान’ हा मूळ तेलुगू भाषेतील सुपरहिरो संकल्पनेवर आधारित चित्रपट आहे. हनुमानाचा अवतार असलेल्या एका तरुणाची ‘लार्जर दॅन लाइफ’ कथेची झलक या टीझरमध्ये पहायला मिळते. सर्वसाधारण बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या VFX ने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

‘हाच खरा भारतीय सिनेमा आहे’, असं एकाने लिहिलं. तर टीझर पाहून अंगावर काटा आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ‘हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची निवड परफेक्ट आहे, VFX उत्तम आहे, बॅकग्राऊंड म्युझिक खरंच खूप छान आहे. पौराणिक-फिक्शन सिनेमे असेच बनवले जावेत’, अशा शब्दांत युजरने कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

‘आदिपुरुष चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्याने निराशा केली. हनुमान हा आदिपुरुषच्या टीझरपेक्षा 1000 पटींनी अधिक चांगला आहे’, असंही दुसऱ्याने लिहिलं. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपटसुद्धा रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र या चित्रपटातील टीझरवर प्रेक्षकांकडून जोरदार टीका झाली होती. तर दुसरीकडे मोजक्या बजेटमध्येही ‘हनुमान’मध्ये उत्तम दर्जाचा VFX पहायला मिळतोय, असं नेटकरी म्हणतायत.

हनुमान या चित्रपटात तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरत कुमार आणि अमृता यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही डब केला जाणार आहे.