भारताचा हा फ्लॉप चित्रपट पाकिस्तानमध्ये घालतोय धुमाकूळ, OTT वर ट्रेंडिंगमध्ये, सर्वांकडून होतय कौतुक

भारतामधील या बॉलिवूड चित्रपटाने ओटीटीवर प्रदर्शित होताच काही दिवसांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये खळबळ माजवत आहे.

भारताचा हा फ्लॉप चित्रपट पाकिस्तानमध्ये घालतोय धुमाकूळ, OTT वर ट्रेंडिंगमध्ये, सर्वांकडून होतय कौतुक
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 24, 2026 | 5:15 PM

Bollywood Movies : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ-मोठे बजेट असणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, अशातच या महिन्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हक’ हा चित्रपट एक महत्त्वाचा आणि धाडसी चित्रपट ठरत आहे. 1985 मधील ऐतिहासिक शाह बानो प्रकरणापासून प्रेरणा घेतलेला हा कोर्टरूम ड्रामा केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. यामी गौतमने साकारलेली शाजिया ही व्यक्तिरेखा एका मुस्लिम महिलेच्या न्यायासाठीच्या कायदेशीर आणि भावनिक संघर्षाचे प्रभावी चित्रण करते.

चित्रपटात मुस्लिम महिलांच्या भरण-पोषणाच्या अधिकारांवर, विवाहसंस्था, तलाक आणि पितृसत्तात्मक मानसिकतेवर नेमकेपणाने भाष्य करण्यात आले आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच ‘हक’ चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, 2 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट पाकिस्तान आणि नायजेरियामध्येही हा चित्रपट ट्रेंड करू लागला आहे.

देश-विदेशातून भावनिक संदेश

सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित हक नेटफ्लिक्स इंडिया मार्फत जागतिक स्तरावर पोहोचला. केवळ दुसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाला 4.5 मिलियन व्ह्यूज मिळाले. मोठ्या बजेटच्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या चित्रपटांशी स्पर्धा करत असतानाही ‘हक’ चित्रपटाने आपली भक्कम जागा कायम ठेवली आहे.

आलिया भट्ट, कियारा अडवाणी, करण जोहर आणि फराह खान यांसारख्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी सोशल मीडियावरून चित्रपटाचे खुलेपणाने कौतुक केले आहे. यामी गौतमने प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय जबरदस्त असल्याचे सांगितले तर दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी रिलीज झाल्यानंतर सातत्याने देश-विदेशातून भावनिक संदेश येत असल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंग ठरला ‘हक’

भारतामध्ये यश मिळवल्यानंतर काहीच दिवसांमध्ये ‘हक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये ट्रेंड करू लागला आणि लवकरच टॉप चार्टमध्ये पोहोचला आहे. पाकिस्तानी अभिनेते, वकील, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सामान्य प्रेक्षकांनी चित्रपटावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या.

चित्रपटातील अभिनयासोबतच इस्लामिक कायदा, तलाक प्रक्रिया आणि महिलांचे अधिकार यांचे केलेले सादरीकरण पाहून अनेक प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. पाकिस्तानी अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती फाजिला काझीने इंस्टाग्रामवर लिहिले, या चित्रपटाची भावनिक खोली खूप प्रेरणादायी आहे. हा चित्रपट मला अक्षरशः रडवून गेला. यामी गौतम… तुम्ही अप्रतिम आहात अस तिने म्हटलं.