राजकारणात खळबळ! 24 माजी आमदारांना सोबत घेत बड्या नेत्याने पक्ष सोडला, हायकमांडची झोप उडाली
Congress : काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष मलिककार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दोन डझन माजी आमदारांसह पक्ष सोडला
समोर आलेल्या माहितीनुसार, नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आज (शनिवार) आपल्या डझनभर सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह सुमारे 72 नेत्यांनी पक्ष सोडला आहे, यात दोन डझन माजी आमदारांचा समावेश आहे. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असताना हा राजीनामा आला आहे.
नसीमुद्दीन सिद्दीकी काय म्हणाले?
नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी पक्षातून राजीनामा देताला पक्ष नेतृत्वाला सांगितले की, गेल्या काही काळापासून पक्षाच्या कार्यशैली आणि अंतर्गत परिस्थितीबद्दल अस्वस्थ वाटत होते. सूत्रांनी सांगितले की, संघटनेत त्यांच्या भूमिकेचा आणि सूचनांचा योग्य विचार न झाल्याने ते नाराज होते. मात्र राजीनामा देताना सिद्दीकी यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्याला दोष दिलेला नाही.
राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला?
वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘मी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या सदस्यांशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडून देत आहे. माझा राजीनामा स्वीकार करावा ही विनंती.’ सिद्दीकी यांनी हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. राजीनाम्यानंतरच्या निवेदनात त्यांनी म्हटले की, मी जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच्या अन्यायाशी लढण्यासाठी सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात सामील झालो होतो. मात्र काँग्रेस पक्षात ही लढाई लढू शकलो नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नसीमुद्दीन सिद्दीकी आपल्या निवेदनात असेही सांगितले की, त्यांना कोणत्याही काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नाही, परंतु ज्या कामासाठी मी पक्षात सामील झाले ते पूर्ण होत नाही. सध्या ते त्यांच्यासोबत राजीनामा दिलेल्या सर्वांशी सल्लामसलत करत आहेत. ज्या पक्षासोबत काम करण्याचा निर्णय होईल त्याच्या सोबत जनतेच्या लढ्यासाठी नक्कीच प्रयत्न सुरु राहील.
