AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी यांच्या छोट्या जावयाला पाहिल्यानंतर येईल धर्मेंद्र यांची आठवण, लेकीचा नवरा करतो तरी काय?

हेमा मालिनीच्या मोठ्या लेकीचा घटस्फोट, तर छोटी लेक सासरी जगतेय असं आयुष्य... छोट्या जावयाला पाहिल्यानंतर येईल धर्मेंद्र यांची आठवण... फोटो पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या छोट्या जावयाची चर्चा...

हेमा मालिनी यांच्या छोट्या जावयाला पाहिल्यानंतर येईल धर्मेंद्र यांची आठवण, लेकीचा नवरा करतो तरी काय?
Ahana Deol
| Updated on: Apr 06, 2026 | 12:49 PM
Share

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी लेक ईशा देओल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण आई – वडिलांप्रमाणे स्वतःची ओळख भक्कम करु शकली नाही. तर दुसरीकडे, त्यांची छोटी मुलगी अहाना झगमगत्या विश्वापासून खूप दूर आहे. पण अहाना तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या नवऱ्याचं नाव वैभव वोहरा आहे… जे फिल्मी इंडस्ट्रीपासून दूर आहेत. पण त्यांच्या क्षेत्रात वैभव वोहरा हे नाव फार मोठं आहे.

वैभव हे दिल्लीतील एक यशस्वी उद्योजक असून आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स आणि विमान वाहतूक क्षेत्रात त्याची मजबूत पकड असल्याचं मानलं जातं. वैभव वोहरा यांनी इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्समध्ये लॉजिस्टिक्स आणि मेरिटाइम कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी एव्हिएशन लॉजिस्टिक्स नेटवर्कसाठी दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक म्हणूनही काम पाहिले आहे, जे सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स, लुफ्थान्सा आणि एअर कॅनडा यांसारख्या अनेक प्रमुख जागतिक विमान कंपन्यांसाठी फ्रेट फॉरवर्डिंग एजंट म्हणून काम करतात.

वैभव वोहरा यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित बॅबसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे, बॅबसन कॉलेज व्यवसाय आणि उद्योजकता यांसारख्या विषयांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. यामुळे त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत यशाच्या पायऱ्या सातत्याने चढता आल्या आणि आज ते एक प्रस्थापित व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.

अहाना तिच्या सासरच्या मंडळींसोबत दिल्ली येथे राहते आणि झगमगत्या विश्वापासून कायम स्वतःला दूर ठेवते. तर दुसरीकडे वैभव त्यांच्या कामात पूर्णपणे व्यस्त असतात. व्यस्त वेळापत्रक असून देखील ते कुटुंबियांना वेळ देतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या कुटुंबात जावई म्हणून आलेल्या वैभव वोहरा यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे.

वैभव वोहरा एक यशस्वी उद्योजकच नाही तर, एक जबाबदार पती आणि पिता देखील आहेत. याच कारणामुळे अहाना आज तिच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे…

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...