AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाच्या वेळी हेमा मालिनी किती वर्षांच्या होत्या माहितीये? जाणून धक्काच बसेल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे चाहते आणि कुटुंबाने देखील समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान धर्मेंद्र हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत राहिले. हेमा मालिनींशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला होता. पण जेव्हा धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले, तेव्हा हेमा मालिनी किती वर्षांच्या होत्या, त्यांचे वय किती होते हे अनेकांना माहित नसेल. जाणून नक्कीच धक्का बसेल.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाच्या वेळी हेमा मालिनी किती वर्षांच्या होत्या माहितीये? जाणून धक्काच बसेल
Hema Malini was only 6 years old at the time of Dharmendra and Prakash Kaur first marriageImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 16, 2025 | 4:19 PM
Share

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा प्रकृती बिघडल्याने सगळेच चिंतेत होते. चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत होते. धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची तब्येतीत सुधारणा असून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. या बातमीने सर्वांनाच दिलासा मिळाला. धर्मेंद्र पूर्णपणे स्वस्थ होऊन घरी परतले आहेत. तसेच धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी त्यांच्या कुटुंबाने सुरुवातही केली आहे.

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही फारच चर्चेत राहिलं आहे

दरम्यान, धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही फारच चर्चेत राहिलं आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी चर्चेत राहिली आहे. धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या पहिल्या पत्नी आणि पहिल्या लग्नाबद्दलही लहान-मोठी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक असतात. हेमा मालिनीशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नावेळी हेमा यांचे वय किती होते?

जेव्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रकाश कौर घटस्फोट देण्यास तयार नसल्याने हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. पण हे अनेकांना माहित नसेल की त्यांचे आणि प्रकाश कौर यांचे लग्न झाले तेव्हा हेमा मालिनी किती वर्षांच्या होत्या ते. हे जाणून आश्चर्य वाटेल की धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नावेळी हेमा मालिनी फक्त सहा वर्षांच्या होत्या. धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या पहिल्या लग्नाच्या वेळी, त्या शाळेत जात होत्या. हेमा मालिनी यांनी 12 वी पर्यंत डीटीईए मंदिर मार्ग येथे शिक्षण घेतले. त्यानंतर, अभिनय करण्यासाठी तिने शाळा सोडली.

धर्मेंद्र हे आधीच विवाहित असल्याचं हेमा मालिनी यांना माहित होते 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या वयात तब्बल 13 वर्षांचे अंतर आहे. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले तेव्हा ते देखील फक्त 19 वर्षांचे होते. हेमा मालिनी यांनी देखील जेव्हा धर्मेंद्र यांच्याशी लग्नाचा विचार केला तेव्हा धर्मेंद्र हे आधीच विवाहित आहेत हे माहित होते. त्यांच्यात १३ वर्षांचा फरक आहे याचा त्यांनी फार विचार केला नाही कारण तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे एकमेकांच्या प्रेमात होते. सगळ्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...