AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी आणि मुली धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची करतायत जय्यत तयारी; कसं असणार आहे सेलिब्रेशन?

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने चाहते सुखावले आहेत. 8 डिसेंबर 2025 रोजी ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. हेमा मालिनी आणि मुली इशा देओल यांच्यासह संपूर्ण देओल कुटुंब त्यांच्या या खास वाढदिवसाची जय्यत तयारी करत आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासोबत हा वाढदिवस भव्य समारंभाने साजरा केला जाईल.

हेमा मालिनी आणि मुली धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची करतायत जय्यत तयारी; कसं असणार आहे सेलिब्रेशन?
Hema Malini and daughters are preparing for Dharmendra 90th birthday, How will the celebration be Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2025 | 11:20 AM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील “ही-मॅन” असणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा प्रकृती बिघडल्याने सगळेच चिंतेत होते. चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत होते. धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची एक टीम सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून होती आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबतच होते.मात्र आता त्यांची तब्येतीत सुधारणा असून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. या बातमीने सर्वांनाच दिलासा मिळाला. धर्मेंद्र पूर्णपणे स्वस्थ होऊन घरी परतले आहेत. त्यांच्या परतण्याची बातमी सार्वजनिक होताच, चाहते आणि जवळच्या मित्रांनी आनंद व्यक्त केला.

8 डिसेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस

दरम्यान धर्मेंद्र यांचा वाढदिवसही जवळ आला आहे. ही-मॅन 8 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आता धर्मेंद्र यांची तब्येत सुधारली आहे. ते हळूहळू रिकव्हर होत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी त्यांच्या कुटुंबाने सुरु केली आहे. यावेळी, संपूर्ण कुटुंब 8 डिसेंबर रोजी एकत्रितपणे एका भव्य समारंभाचे नियोजन करत आहे.

कसं असणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन?

एका वृत्ताप्रमाणे हेमा मालिनी यांनी एका खास कौटुंबिक मेळाव्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर येत आह. ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहतील. दरम्यान, ईशा देओलनेही तिचे वडील बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

देओल कुटुंब त्यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी

धर्मेंद्र घरी परतल्याने देओल कुटुंबातील वातावरण पुन्हा एकदा सकारात्मक आणि आनंदी झाले आहे. सनी देओल आणि बॉबी देओल हे सतत रुग्णालयात वडिलांसोबतच होते. पण आता धर्मेंद्र यांना स्वस्थ पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केलं आहे. त्यांच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा पाहता येत्या काही दिवसात ते पूर्वीसारखेच सक्रिय होतील अशी सर्वांनाच आशा आहे.

त्यानमुळे आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, देओल कुटुंब त्यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत. तसेच धर्मेंद्र यांचे चाहते देखील त्यांचा 90 व्या वाढदिवसाची , सेलिब्रेशनची आणि मुख्यत: धर्मेंद्र यांना पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.