‘अॅक्शन का स्कूल टाइम…’मधला हा चिमुरडा आता काय करतो?

'अॅक्शन का स्कूल टाइम' या जाहिरातीत झळकलेला कुरळ्या केसांचा मुलगा म्हणजे तेजन दिवानजी. तो आता डॉक्टर झाला असून कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये तो तज्ज्ञ आहे

'अॅक्शन का स्कूल टाइम...'मधला हा चिमुरडा आता काय करतो?
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 5:09 PM

मुंबई : जाहिरातींच्या जिंगल्स नेहमीच आपल्या ओठांवर सहज रुळतात. नव्वदच्या दशकातील अनेक जाहिराती तुमच्या आजही स्मरणात असतील. मग ती मॅगी असो, बोर्नव्हिटा असो किंवा फेविकॉल. आणखी एका जाहिरातीचं गाणं तुम्ही कायम गुणगुणलं असेल, ते म्हणजे ‘अॅक्शन स्कूल टाइम शूज’चं. (Action School Time Shoes)

‘अॅक्शन का स्कूल टाइम…’ हे चार शब्द ऐकूनच नव्वदच्या दशकातील अनेक आठवणी तुमच्या मनात ताज्या झाल्या असतील. कित्येक जणांच्या डोक्यात तर जाहिरातीचं जिंगलही वाजायला सुरुवात झाली असेल.

‘(गजराचा आवाज) ओ हो हो स्‍कूल टाइम अ‍ॅक्‍शन का स्‍कूल टाइम… प्रेयर्ज होती एव्हरी मॉर्निंग स्टाईल से होती सबकी चेकिंग क्‍लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट लेक्‍चर.. गुड… गुड मॉर्निंग टीचर फायटिंग, फ्रेण्डशीप, मस्ती, पीटी बजी बेल और हो गयी छुट्टी ओ हो हो स्‍कूल टाइम अ‍ॅक्‍शन का स्‍कूल टाइम…’

या जाहिरातीत झळकलेला कुरळ्या केसांचा मुलगा आजही तुमच्या लक्षात असेल. टाय बांधणाऱ्या, शू पॉलिश करणाऱ्या आणि जाहिरातभर मस्ती करणाऱ्या या चिमुरड्याचं नाव आहे तेजन दिवानजी (Tejan Diwanji). अॅक्शनसोबतच मॅगी, बँड-एडसारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तो झळकला होता. ‘पहला नशा’ गाण्याच्या रिमिक्समध्येही तो दिसला होता.

बरेचसे बालकलाकार मनोरंजन विश्वात पुनरागमन करत असताना वीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर तेजन कुठे दिसला नाही. तेव्हा अनेक जणांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेजनने मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला.

तेजन आता डॉ. तेजन दिवानजी झाला आहे. त्याने अमेरिकेतील ‘द युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड मेडिकल सेंटर’मध्ये (The University of Maryland Medical Center) वैद्यकीय उच्चशिक्षण घेतलं. मेरिलँडमधील बाल्टिमोरमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी (Radiation Oncology) विभागात तो कार्यरत आहे. कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या रेडिएशन उपचारांचा तो तज्ज्ञ आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.