सेटवर अभिनेत्रीच्या नाकातून रक्तस्त्राव; रुग्णालयात दाखल

शुटिंग सुरू असताना प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खालावली; नाकातून रक्तस्त्राव होताच रुग्णालयात दाखल

सेटवर अभिनेत्रीच्या नाकातून रक्तस्त्राव; रुग्णालयात दाखल
सेटवर अभिनेत्रीच्या नाकातून रक्तस्त्राव; रुग्णालयात दाखल
| Updated on: Dec 27, 2022 | 4:14 PM

Himanshi Khurana Hospitalized: बिग बॉस स्पर्धक आणि पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना (Himanshi Khurana) ची परदेशात शुटिंग दरम्यान प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रोमानियामध्ये उणे 7 डिग्री सेल्सिअस तापमानात आगामी ‘फत्तो दे यार बडे ने’ चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना अभिनेत्री प्रकृती खालावली. अचानक ताप आणि नाकातून रक्तस्त्राव झाल्यामुळे अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रोमानियामध्ये उणे 7 डिग्री सेल्सिअस तापमानात अभिनेत्री शुटिंग करत होती. प्रचंड थंडीमध्ये त्रास होत असताना देखील अभिनेत्रीने शुटिंग थांबवली नाही. पण अचानक ताप आणि नाकातून रक्तस्त्राव झाल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सध्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी अभिनेत्री आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. स्वतःच्या प्रकृतीबद्दल अभिनेत्रीने सांगितलं नसलं तरी, सोशल मीडीयावर तिने एक पोस्ट शेअर करत थंडी पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी भरपूर कपडे घातले आहेत.

 

 

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘प्रचंड थंडी आहे, पण शूट करावंच लागेल…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओ चर्चेत आहे.

हिमांशी बिग बॉस सीझन 13 मध्ये स्पर्धक होती. अभिनेत्रीने एका चॅट शोमघ्ये बिग बॉस शोबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘बिग बॉसमध्ये असलेल्या नकारात्मक वातावरणामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती. ज्यामुळे माझं प्रचंड नुकसान झालं. यासर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी मला दोन वर्ष लागली..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.