Hina Khan : पुढच्या टर्ममध्ये ते निवडून येणार नाहीत, पण…मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या दुसऱ्या लग्नावर हिना खानची प्रतिक्रिया

Hina Khan : अभिनेत्री हिना खाननं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

Hina Khan : पुढच्या टर्ममध्ये ते निवडून येणार नाहीत, पण...मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या दुसऱ्या लग्नावर हिना खानची प्रतिक्रिया
| Updated on: Nov 01, 2026 | 9:26 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या हिना खाननं जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हिनानं ओमर अब्दुल्ला यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं. राजकीय नफा-तोट्याची चिंता न करता ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या प्रेमाला आणि नातेसंबंधाला पाठिंबा दिला आणि ते खंबीरपणे उभे राहिले, असं ती म्हणाली.

हिना खान म्हणाली की, कोणत्याही परिस्थितीत नात्याला प्राधान्य देणं हा एक आदर आहे. धार्मिक आधारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सल्ला देताना हिना खान म्हणाली की, लोकांना जगण्याचा आणि त्यांचं आयुष्य निवडण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त करत हिनानं लिहिले, ‘खूप प्रेम! या दोघांसाठी मी खूप आनंदी आहे. ते मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सोडलं नाही, उलट तिच्या पाठीशी उभे राहिले. खूप खंबीर माणूस आहे हा.’

Loading...

हिना खाननं ओमर अब्दुल्ला यांचं कौतुक केलं

हिना खान म्हणाली की, ओमर अब्दुल्ला पुढची निवडणूक जिंकू शकणार नाहीत, पण प्रेम निवडणं अधिक महत्त्वाचं आहे. ‘पुढच्या टर्ममध्ये ते निवडून येणार नाहीत, पण काय फरक पडणार आहे? त्यांनी प्रेम निवडलं. लोक काय म्हणतात, यानं काहीच फरक पडत नाही, हे त्यांनी सिद्ध केलंय. धर्माच्या ठेकेदारांना एक छोटासा सल्ला, जगा आणि जगू द्या. त्यांचं भविष्य देवच ठरवेल. तुम्ही देव नाही.’

 

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि ज्येष्ठ पत्रकार निधी रझदान यांनी 31 ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. ट्विटरवर दोघांचे फोटो शेअर करताना ओमर अब्दुल्ला यांनी लिहिलं की, ‘काल एक नवीन प्रवास सुरू झाला’. निधी राझदानला पोस्टमध्ये टॅग केलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाआधी जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत श्रीनगरमध्ये एका साध्या सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. ओमर अब्दुल्ला यांचं पहिलं लग्न पायल अब्दुल्लासोबत झालेलं. दोघांना दोन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us