Aishwarya Rai : त्याचं आयुष्यात येणं म्हणजे वाईट स्वप्न, दारूचं व्यसन अन्…सलमानसोबतच्या नात्याबद्दल ऐश्वर्या रायनं केलेला खुलासा
आज बॉलिवूडची सौंदर्यवती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा वाढदिवस. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने तिने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या हिने मनोरंजनविश्वात प्रवेश केला आणि अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

आज बॉलिवूडची सौंदर्यवती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा वाढदिवस. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने तिने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या हिने मनोरंजनविश्वात प्रवेश केला आणि अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’ आणि ‘गुरू’ यांसारख्या चित्रपटांमधील हिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या ब्रेकअपची कहाणीही कोणापासून लपलेली नाही. 2002 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या वेळी ऐश्वर्याने सलमानवर आरोप केले होते. ऐश्वर्याने सांगितले की, सलमानने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. भविष्यात ती कधीही सलमानसोबत काम करणार नसल्याचेही तिने सांगितले. मात्र, सलमानने या गोष्टींना नेहमीच नकार दिला. 2001 मध्ये सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात एकमेकांच्या जवळ आले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली. या चित्रपटातील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे खूप पण कौतुक झाले.
मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2001 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपच्या वेळी सलमान आणि ऐश्वर्यामध्ये खूप भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. सलमानने तिचे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे ऐश्वर्याने सांगितले. ती म्हणाली होती, ‘माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या स्वत:च्या स्वाभिमानाचा विचार करता, हे खूप आहे… मी भविष्यात कधीही सलमान खानसोबत काम करणार नाही. सलमानचा हा अध्याय माझ्या आयुष्यातील एक दुःस्वप्न होता आणि मी देवाचे आभार मानते की ते सर्व संपले. दारूचे व्यसन आणि शारीरिक शोषणामुळे ऐश्वर्या त्रस्त होती. ऐश्वर्याने असेही सांगितले की, ती सलमानला त्याच्या सर्व वाईट सवयींसाठी माफ करायची. ती म्हणाली, ‘सलमानचे दारूचे व्यसन, शारीरिक शोषण आणि अपमानाला ती कंटाळली होती. असे असूनही मी त्याच्या पाठीशी उभी राहिले. बदल्यात मला फक्त दुःख आणि वेदना मिळाल्या.
या प्रकरणातील माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल उलट बोलले गेले. माझे सहकलाकारांसोबतचे संबंध बिघडवण्याचाही प्रयत्न झाला. ऐश्वर्यामुळे सलमान आणि शाहरुखमध्ये मारामारी! वृत्तांवर विश्वास ठेवला तर सलमानमुळे ऐश्वर्याला शाहरुखच्या ‘चलते चलते’ चित्रपटातून वगळण्यात आले आणि तिच्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आले. सलमान त्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि जोरजोरात ओरडू लागला. सलमान आणि शाहरुखमध्ये भांडण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, सलमान एकदा दारूच्या नशेत ऐश्वर्याच्या घरी गेला आणि जोर जोरात तिचा दरवाजा ठोठावला होता.
2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न :
गुरू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढली होती. याआधीही दोघेही एकमेकांना ओळखत होते, मात्र गुरूच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही एकमेकांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. 20 एप्रिल 2007 रोजी, अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न बच्चन कुटुंबाच्या प्रतीक्षा बंगल्यावर झाले. आज दोघांनाही एक मुलगी ‘आराध्या’ आहे.
