AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Chief Marshal Ashutosh Dixit : नव्या एअर फोर्स प्रमुखांनी सर्वांच मन जिंकलं; ज्यांनी घडवलं त्यांना सॅल्यूट मारून इतरांसमोर ठेवला आदर्श

भारतीय हवाई दलाचे नवे Air Chief Marshel आशुतोष दीक्षित यांनी भारतीय वायुसेनेचे 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशी एक गोष्ट केली, ज्यामुळे आजूबाजूच्या सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. त्यांनी केलेली ती गोष्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

Air Chief Marshal Ashutosh Dixit : नव्या एअर फोर्स प्रमुखांनी सर्वांच मन जिंकलं; ज्यांनी घडवलं त्यांना सॅल्यूट मारून इतरांसमोर ठेवला आदर्श
Air Chief Marshal Ashutosh DixitImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 9:22 PM
Share

देशाची जबाबदारी खांद्यावर आली की अभिमान वाटतोच; पण ज्यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मदत केली, मेहनत घेतली, आयुष्यभर साथ दिली त्यांना विसरून कसं चालेलं? असाच एक सुंदर क्षण भारतीय वायुसेनेचे नवे प्रमुख ‘एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित’ यांच्या बाबतीत पाहायला मिळाला. वायुसेनेची कमान स्वीकारल्यानंतर त्यांनी आधी देशाच्या शहीद जवानांना अभिवादन केले आणि त्यानंतर आपल्या आई आणि सासूबाईंना सॅल्यूट करत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

31 ऑक्टोबर 2026 रोजी आशुतोष दिक्षीत यांनी भारतीय वायुसेनेचे 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 1 नोव्हेंबरला ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले.तिथे त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यानंतर तिथे उपस्थित असलेल्या आपल्या आई निर्मला दीक्षित आणि सासूबाई कमला पांडे यांच्याजवळ ते गेले. त्यांनी दोघींच्या पाया पडून आर्शिवाद घेतले आणि त्यांना सॅल्यूटही केला. नव्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोण आहेत Air Chief Marshel आशुतोष दीक्षित

आशुतोष दीक्षित यांचा जन्म 9 डिसेंबर 1966 रोजी झाला. 6 डिसेंबर 1986 रोजी त्यांची भारतीय वायुसेनेच्या फायटर स्टीममध्ये नियुक्ती झाली. त्यांना मिराज – 2000, मिग, जग्वार आणि तेजस यांसह 20 हून अधिक प्रकारची विमाने उडवण्याचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत 3,500 तासांहून अधिक उड्डाण केले आहे. ते अनुभवी फायटर पायलट, ए्क्सपेरिमेंटल टेस्ट पायलट आणि क्वालिफाईड फ्लाईंग इस्ट्रक्टर आहेत. आपल्या धोरणात्मक नियोजनासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ओळखले जाणारे एअर चीफ मार्शल दीक्षित यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत ‘एअर चीफ मार्शल दीक्षित’ यांनी विविध कमांड, स्टाफ आणि प्रशिक्षण पदांवर काम केले आहे.

हवाई दलाचा पदभार स्वीकारताना एअर चीफ मार्शल यांनी आपला सन्मान आणि अभिमान आपल्या भाषणातून व्यक्त केलं. त्यांनी आपल्यावरील विश्वासाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांचे आभार मानले. त्यांनी निवृत्त होणारे हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने अचूक आणि निर्णायक हवाई शक्तीचे प्रदर्शन केले. दीक्षित म्हणाले की, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे सज्ज असलेल्या हवाई दलाची कमान सोपवली आहे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती