AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनिती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात मानवी आयुष्यात काही चुका या अशा असतात, ज्यांना कधीही माफी मिळत नाही, त्या तुम्हाला प्रचंड महागात पडू शकतात.

Chanakya Niti : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 9:17 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात अनेकदा चुका करतो, या चुकांमधून तो शिकत असतो. परंतु अशा काही चुका असतात, ज्यांना कधीही माफी मिळत नाही, या चुका प्रचंड महागात पडू शकतात. त्यामुळे माणसाने या ठिकाणी आपलं प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वकच उचललं पाहिजे. अशा काही चुका असतात, त्या जर तुमच्या हातून एकदा झाल्या तर पुन्हा कधीही त्या पुन्हा सुधारण्याची संधी तुम्हाला प्राप्त होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य  यांनी नेमकं काय म्हटलं आहे?  त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात माणसाला त्याच्या आयुष्यात शिक्षणाची संधी एकदाच मिळते, असं म्हणतात की माणूस आयुष्यभर शिकत असतो, तो शिकू शकतो. परंतु विद्यार्थीदशेमध्ये जी शिक्षणाची संधी त्याला मिळते, ती संधी त्याला आयुष्यात पुन्हा कधीही मिळत नाही. त्यामुळे या काळात जे लोक अभ्यास करतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात भविष्यामध्ये चांगल्या संंधी प्राप्त होतात, चांगला रोजगार मिळतो. त्यांचं संपूर्ण आयुष्य आरामात जातं. परंतु जे लोक या विद्यार्थी दशेत अभ्यास करत नाहीत, त्यांना मात्र आयुष्यभर प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे शिक्षणाकडे नेहमी एक संधी म्हणूनच पाहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य देतात. शिक्षण अर्धवट सोडण्याची चुक कधीच करू नका, असंही चाणक्य म्हणतात.

आई-वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात या जगात जर तुमचे सर्वात मोठे हितचिंतक कोणी असेल तर ते म्हणजे तुमचे आई-वडील असतात. त्यामुळे कधीही तुमच्या आई-वडीलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची चुक करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

क्रोध – चाणक्य म्हणतात क्रोधावर विजय मिळवा, कोणताही निर्णय कधीही क्रोधाच्या भरात घेण्याची चूक करू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती