125 रुपयांचे पहिले मानधन, भाडे भरण्यास नव्हते पैसे, अखेर मिळाला TMKOC, आज आहे 40 कोटींची मालकीन

बबिता हे कॅरेक्टर साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता या २४ वर्षांपासून घराघरात पोहचल्या आहेत. या स्थानावर पोहचण्याआधी मुनमुन दत्ता यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले आहे.

125 रुपयांचे पहिले मानधन, भाडे भरण्यास नव्हते पैसे, अखेर मिळाला TMKOC, आज आहे 40 कोटींची मालकीन
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah star
| Updated on: Oct 27, 2026 | 11:32 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील कलाकार घराघरात पोहचले आहेत. ही मालिका निखळ मनोरंजन करत असून दिवसेंदिवस ही मालिका लोकप्रियतेचे नवे शिखर गाठत आहे. या मालिकेतील एक पात्र बबिता कृष्णन अय्यर आणि जेठालाल यांची केमिस्ट्री प्रचंड मनोरंजन करणारी ठरली आहे. हे कॅरेक्टर साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ता या २४ वर्षांपासून घराघरात पोहचल्या आहेत. या स्थानावर पोहचण्याआधी मुनमुन दत्ता यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले आहे.

साल २००८ मध्ये TMKOC मालिकाला लाँच झाल्यापासून मुनमुन दत्ता या मालिकेचा भाग आहेत. या मुनमुन दत्ता यांना या मालिकेत येण्याआधी मोठा संघर्ष करावा लागला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत मुनमुन यांनी सांगितले की ही मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हा दिलीप जोशी यांनी आपले नाव या मालिकेसाठी सूचवल्याचे सांगितले.

Loading...

मुनमुन दत्ता यांनी २००४ मध्ये झी टीव्हीच्या हम सब बाराती पासून टीव्ही मालिकेत पदार्पण केले होते. त्यानंतर कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस( २००५) आणि पूजा भट्टच्या हॉलिडे ( २००६ ) मध्ये काम केले होते. मात्र,TMKOC मालिकेने तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मला आधी मुंबईत पीजी रेंटचे भाडे भरण्यासाठी आणि माझ्या पोर्टफोलिओसाठी फोटोग्राफरला देण्यासाठी पैसे हवे होते. माझी आई माझ्या वडीलांना न सांगता पैसे वाचवायची. त्या पैशातून मी भाडे भरले आणि ऑडिंटीग सुरु केले होते. आपण बालपणी एअर इंडिया रेडिओवर गायन केले होते. तेव्हा मला माझी पहिली कमाई १२५ रुपयांची मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या जुने दिवस आठवले तर आश्चर्य वाटते असे मुनमुन दत्ता म्हणतात.

मुनमुन पुण्यात मॉडेलिंग करत होत्या आणि नंतर त्या मुंबईत अभिनयाकडे वळल्या. टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील सुरुवातीच्या कामातून त्यांना अभिनयाचा अनुभव मिळत गेला, परंतु ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. आज मुनमुन दत्ता यांची संपत्ती ४० कोटी रुपये आहे. मुनमुन दत्ता यांचे युट्युब चॅनल असून त्या ट्रॅव्हल, लाईफ स्टाईलवर कार्यक्रम करत असतात.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us