Hruta Durgule : अमराठी मुलासोबत लग्न केल्यामुळे ट्रोल, हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली; म्हणाली, मी गरोदर राहिल्यानंतरही…

Hruta Durgule : मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेला अमराठी मुलासोबत लग्न केल्यामुळे ट्रोल करण्यात आलेलं. अशातच आता अभिनेत्रीनं एका मुलाखतीत ट्रोलिंगवर तिचं मत व्यक्त केलं आहे.

Hruta Durgule : अमराठी मुलासोबत लग्न केल्यामुळे ट्रोल, हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली; म्हणाली, मी गरोदर राहिल्यानंतरही...
| Updated on: Oct 01, 2026 | 9:00 PM

मराठी अभिनेत्रींना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. लग्नानंतर, वजन वाढल्यानंतर, बाळ झाल्यानंतर अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. अभिनेत्री हृता दुर्गुळेलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अमराठी मुलासोबत लग्न केल्यानंतर हृता ट्रोल झालेली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाली हृता दुर्गुळे?

Loading...

हृता दुर्गुळे म्हणाली की, ‘मी म्हटलेलं की, ट्रोलिंग खूप बोअर आहे. मला असं वाटतं की, तुम्ही कुठेही बसून कमेंट करता आणि बोलता हे खूप वाईट आहे. माणूस म्हणून आपण काय करू शकतो तर एकमेकांशी चांगलं वागू शकतो आणि महिलांवर होणारी टीका तर वाईटच आहे. मीही ते अनुभवलं आहे. कारण, जेव्हा मी करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा मी १७ वर्षांची होते आणि आता मी त्याच्या दुप्पट वयाची आहे.’

हृता पुढे म्हणाली की,  ‘त्यामुळे स्पष्टपणे सांगायचं तर मी मुलगीची बाई टेलिव्हिजनवरच झाले आहे. त्यामुळे मध्ये एक असा काळ असतो की तुमचं वजन वाढतं. जेव्हा माझंही वजन वाढलं होतं. तेव्हा माझंही खूप ट्रोलिंग झालं होतं. पण आता सुदैवाने माझ्या आजू-बाजूची माणसं खूप चांगली आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाबरोबर असता तुमच्या अवतीभोवती कशी माणसं आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.’

‘आता मी यासगळ्याच्या खूप पलीकडे आहे. आता कदाचित मीही प्रेग्नन्ट राहिल्यानंतर मलाही ट्रोल करतील, माझ्यावरही बाळ झाल्यानंतर टीका होईलच. तुम्ही किती लोकांना थांबवणार. लग्न लवकर केलं म्हणत ट्रोल केलं. त्यात शाह आडनावाच्या मुलाशी केलं त्यामुळेही ट्रोल केलं. त्यामुळे आता यावर काय बोलणार. मी आधीही याबद्दल कधी प्रतिक्रिया दिली नाही, पुढेही देणार नाही आणि सुदैवाने मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसते.’ असं हृता शेवटी म्हणाली. ‘लोकसत्ता‘ला दिलेल्या मुलाखतीत हृता दुर्गुळे बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us