AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युएईला दणादण कुटलं, मग पाकिस्तानसमोर काय झालेलं? 54 बॉलमध्ये 204 धावा चोपणारा Vaibhav Sooryavanshi काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi After Match Statement : यूएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने 204 धावांची ऐतिहासिक खेळी करत क्रिकेटविश्वाला थक्क केले. अवघ्या 53 चेंडूंत त्याने द्विशतकाचा टप्पा गाठला. भारत अ संघाला 7 विकेट्सने विजय मिळवून देत त्याने सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवून दिला. सामन्यानंतर वैभवने आपल्या आक्रमक खेळीमागचे रहस्य सांगितले.

युएईला दणादण कुटलं, मग पाकिस्तानसमोर काय झालेलं? 54 बॉलमध्ये 204 धावा चोपणारा Vaibhav Sooryavanshi काय म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi After Match StatementImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 6:49 PM
Share

वैभव सूर्यवंशीने आज कहर खेळ केला आहे. त्याने यूएई विरुद्ध भारत अ संघाचा सामना आज दोहा स्टेडिअमवर खेळवला गेला. यावेळी वैभव मैदानात उतरला आणि त्याच्या बॅटने एकच धुमाकूळ घातला. वैभवनं या सामन्यामध्ये तब्बल 204 धावांची खेळी केली. सुरुवातील सर्वात जलद फिफ्टी, त्यानंतर त्याने सर्वात जलद शतक आणि त्यानंतर पुढे त्याने डबल शतकाचा धमाकाही केला. त्यामुळे सर्वत्र वैभवचं कौतुक होत आहे. वैभवने केवळ हा मोठा कारनामा केवळ 53 बॉलमध्ये करुन दाखवला आहे. या शानजदार खेळीमुळे भारताने विजयही साकारला आणि सेमी फायनल गाठली आहे. सामन्यानंतर वैभवने त्याचे स्टेटमेंट दिले. यावेळी त्याने ही खेळी कशी साकारली याबद्दल संवाद साधलाय.

दरम्यान, आज तडाखेबाज खेळी केलेल्या वैभवला मागील दोन सामन्यांमध्ये चांगली खेळी करता आली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध त्याने केवळ 11 धावा केलेल्या. त्यानंतर तो बाद झालेला. त्यामुळे तो सामनाही भारताला गमवावा लागलेला. यावर आता वैभवने सामना जिंकल्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी स्वीकारताना प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘गेल्या दोन सामन्यांमध्ये मी बराच स्थिरावलो, पण चांगले रन बनवू शकत नव्हतो. आज मैदानात उतरलो तेव्हा वेळ घेऊन खेळायचं ठरवलेलं. पण एक दोन बॉल खेळलो त्यानंतर मला जाणवलं की गोलदांजांना जास्त काही मदत मिळत नाही. त्यामुळे मी माझे हात खोलले आणि संपूर्ण ताकदीने खेळलो. माझ्या मनात दुसरा कोणताही विचार नव्हता खेळपट्टी चांगली होती, बॉल बॅटवर व्यवस्थित येत होता, म्हणून मी माझ्या नैसर्गिक खेळावर भर दिला.’

पुढे बोलताना वैभव म्हणाला, मला फॉर्ममध्ये परत येऊन छान वाटत आहे.माझे प्रशिक्षक मला नेहमी सांगतात की बॉलवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसे केले तर मला खेळणे सोपे जाईल आणि आज त्याचा कुठेतरी फायदा झाला. पुढील सामन्यांमध्येही मी माझी लय चांगली ठेऊन कामगिरी करण्यावर फोकस करेन. सेमी फायनल जिंकून फायनललाही पोहोचू अशी अपेक्षा आहे. मी माझ्या पद्धतीने फलंदाजी करत राहील, मानवी स्वभावानुसार थोड दडपण होत पण थोडे बॉल खेळलो की पुन्हा मी नॉर्मल होतो आणि सामना चांगल्याप्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, या सामन्यामध्ये 249 धावांचं लक्ष्य भारताला मिळालं होतं. पहिल्यांदा टॉस जिंकून यूएईने बॅटिंग घेतली होती. त्यानंतर प्रत्त्युतर देण्यासाठी भारत मैदाना उतरला आणि वैभवच्या धडाकेबाज खेळीमुळे सात विकेटने भारताने विजय मिळवला.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी