AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Meeting: यापुढे ‘स्वर्गीय अजितदादा’ असा उल्लेख नको; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा ठराव! मुख्यमंत्र्यांकडे 3 महत्त्वाच्या मागण्या

बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊ नगर करण्यात यावे. तसेच १२ जानेवारीला ला विशेष मंत्री मंडळ बैठक जिजाऊ यांच्या जन्मगाव सिंदखेड राजा इथे घेण्याची मोठी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनाही पत्र पाठवले आहे.

NCP Meeting: यापुढे 'स्वर्गीय अजितदादा' असा उल्लेख नको; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा ठराव! मुख्यमंत्र्यांकडे 3 महत्त्वाच्या मागण्या
NCP News
| Updated on: Nov 24, 2026 | 6:35 PM
Share

 प्रदीप कापसे, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या नावाच्या उल्लेखाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊनगर करा या मागणीसह तीन महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत.  राष्ट्रवादीच्या महिला संघटना प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहेत राष्ट्रवादीचे ठराव? 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये स्वर्गीय अजित दादा हा शब्द न वापरता लोकनेते अजित दादा हा शब्द वापरावा असा महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊ नगर करण्यात यावे. तसेच १२ जानेवारीला ला विशेष मंत्री मंडळ बैठक जिजाऊ यांच्या जन्मगाव सिंदखेड राजा इथे घेण्याची मोठी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनाही पत्र पाठवले आहे.

प्रमुख मागण्या

  • मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विशेष राज्य मंत्रिमंडळ बैठक आयोजित करावी.
  • दिनांक १२ जानेवारी २०२७ रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शक्य असल्यास त्याच दिवशी अथवा त्या निमित्ताने त्यांच्या जन्मभूमी सिंदखेड राजा येथे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात यावी. विकास आराखड्यास अंतिम मान्यता व निधी द्यावा.
  • मा. अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सादर झालेल्या सुमारे ₹४५४ कोटींच्या सुधारित विकास आराखड्‌याची सद्यस्थिती तपासून, आवश्यकतेनुसार त्याचे अ‌द्ययावतीकरण करून संबंधित उच्चस्तरीय समिती व शिखर समितीमार्फत अंतिम मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. मंजूर विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
  •  ऐतिहासिक वारशाच्या जतनास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखुजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा, समाधीस्थळे, मंदिरे, मोती तलाव आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्त्वीय नियमांनुसार जतन, संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवावा.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी