मला काजोल बनायचं होतं…. आघाडीची ही अभिनेत्री काजोलची जबरदस्त फॅन , ‘गुप्त’ पाहून घेतला थेट बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय

सिनेसृष्टीत अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या काजोलचे लाखो फॅन आहेत. पण चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्रीही तिची डायहार्ड फॅन आहे. तिचा गुप्त चित्रपट पाहूनच तिने सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री कोण माहीत आहे का ?

मला काजोल बनायचं होतं.... आघाडीची ही अभिनेत्री काजोलची जबरदस्त फॅन , गुप्त पाहून घेतला थेट बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय
| Updated on: Jul 07, 2023 | 5:36 PM

नई दिल्ली : काजोल (kajol) ही चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री. तिचं सौंदर्य, मनमोकळा स्वभाव आणि खणखणीत अभिनय यामुळे तिचे लाखो फॅन्स आहेत. पण बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्रीदेखील तिची फॅन आहेत. खरंतर काजोलचं ‘गुप्त’ चित्रपटातील काम पाहूनच तिने सिनेसृष्टीत येण्याचा आणि अभिनेत्री निर्णय घेतला. ती अभिनेत्री कोण माहीत आहे का ?

या अभिनेत्रीने नवाजुद्दिन सिद्दीकीसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबतही काम केले आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे हुमा कुरेशी (huma qureshi) . अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये सहाय्यक भूमिका साकारल्यानंतर ती रातोरात स्टार बनली. त्या चित्रपटानंतर हुमा अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली. हुमाचा ‘तरला’ चित्रपट हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटानिमित्त ती बऱ्याच मुलाखती देत असून त्याचवेळी तिने अभिनेत्री होण्यामागचं कारण , इस्पिरेशनही सांगितलं.

मला काजोल बनायचं होतं..

असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी एखाद्या कलकाराचा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. तुझ्यासोबतही असं काही झालं आहे का ? असा प्रश्न हुमाला विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की मी काजोलची मोठी फॅन आहे. ‘ मी 1997 मध्ये जेव्हा ‘गुप्त’ चित्रपट पाहिला तेव्हाच मला वाटलं की मला काजोल बनायचं आहे. मला तिचं काम प्रचंड आवडतं, ती अगदी सहजतेने काम करते,’ अशा शब्दांत हुमाने तिचं कौतुक केलं.

तरला दलाल यांच्या भूमिकेत हुमा कुरेशी

प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित ‘तरला’ या चित्रपटात हुमा प्रमुख भूमिका साकारत आहे. तरला दलाल यांनी ‘तरला दलाल शो’ आणि ‘कुक इट अप विथ तरला दलाल’ सारखे लोकप्रिय कुकिंग शो होस्ट केले होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून पियुष गुप्तांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. सेलिब्रिटी शेफ तरला दलाल यांना 2007 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.