
Shah Rukh Khan Networth 2025: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आता संपत्तीतही किंग झाला आहे. त्याची संपत्ती 1 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. म्हणजे शाहरुख खान 12,000 कोटींचा धनी झाला आहे. 33 वर्षांपासून चित्रपट सृष्टीचा अनभिषिक्त सम्राट असलेला शाहरुख खान आता केवळ भारतातलाच नाही तर जगातला सर्वाधिक श्रीमंत अभिनेता बनला आहे. 1 ऑक्टोबर रोजी हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 जाहीर झाली आहे. यात शाहरुखच्या संपत्तीचा दाखला देत त्याला सर्वात श्रीमंत स्टार बनवले आहे.
हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार आता शाहरुख खान याची संपत्ती आता 1.4 अब्ज डॉलर म्हणजेच 12490 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. यामुळे शाहरुख खान जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. शाहरुख खान याच्या संपत्तीत वाढ होण्यासंदर्भात बोलताना सांगितले गेले की बॉलीवूडचा बादशाह 59 वर्षांचा झाला असून त्याने पहिल्यांदाच बिल्येनिअर क्लब जॉईंट केला आहे. त्याच्याजवळ आता 12490 कोटींची संपत्ती आहे.
शाहरुख खान याच्याकडे किती संपत्ती आहे याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की अभिनेता टेलर स्विफ्ट (1.3 अब्ज डॉलर), अर्नोल्ड श्वार्जेनेगर (1.2 अब्ज डॉलर ), जेरी सेनफेल्ड (1.2 अब्ज डॉलर),आणि सेलेना गोमेज (720 दशलक्ष डॉलर) सारख्या ग्लोबल स्टारच्या पुढे शाहरुख खान याची संपत्ती पोहचली आहे.
शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा श्रीमंत अभिनेता आहे सर्वांना माहिती आहे. परंतू आता ताज्या आकडेवारीनुसार त्याला स्पर्धा करणाऱ्या अभिनेत्यांच्या आणि त्याच्या संपत्तीतील अंतर आता वाढले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान याची सहकाही अभिनेत्री जुही चावला आहे. तिची संपत्ती 7790 कोटी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऋतिकचे नाव असून त्याची संपत्ती 2160 कोटी आहे.
शाहरुख खान – 12490 कोटी रुपये
जूही चावला आणि कुटुंब- 7790 कोटी रुपये
ऋतिक रोशन आणि कुटुंब- 2160 कोटी रुपये
करण यश जौहर- 1880 कोटी रुपये
अमिताभ बच्चन आणि कुटुंब – 1630 कोटी रुपये
हुरून रिसर्च इंस्टिट्यूट दरवर्षी रिच लिस्ट सादर करते. गेल्यावर्षीही शाहरुखने टॉप केले होते. परंतू त्याची संपत्ती 870 दशलक्ष डॉलर होती. आता ती वाढून 1.4 अब्ज डॉलर झाली आहे. शाहरुख खानचे अनेक व्यवसाय आहेत.परंतू त्याची मुख्य कमाई चित्रपट आणि जाहीरातीतून होते.