राखी सावंत हिच्यावर आदिल दुर्रानी याने लावले गंभीर आरोप, लोक हैराण, थेट म्हणाला, माझा

राखी सावंत ही केल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत ही आपल्या आयुष्यातील पहिला उमराह करण्यासाठी गेली. यावेळी राखी सावंत हिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.

राखी सावंत हिच्यावर आदिल दुर्रानी याने लावले गंभीर आरोप, लोक हैराण, थेट म्हणाला, माझा
| Updated on: Sep 07, 2023 | 3:42 PM

मुंबई : राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही तूफान चर्चेत आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत थेट लग्नाचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर राखी सावंत हिने जाहिर केले की, अगोदर कोर्टात लग्न (Marriage) केले आणि त्यानंतर निकाह केला. राखी सावंत हिने लग्नानंतर इस्लाम धर्म देखील स्वीकारला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले.

काही दिवस राखी सावंत ही मुंबईमध्ये आदिल दुर्रानी याच्यासोबत सतत स्पाॅट होताना दिसली. यावेळी पापाराझी यांच्यासोबतही राखी सावंत ही धमाल करत होती. मात्र, अचानकच राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आले. राखी सावंत हिने खुलासा करत थेट म्हटले की, आदिल दुर्रानी हा मला घटस्फोट मागत आहे.

यानंतर काही दिवसांमध्येच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर थेट यांचा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी याला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली. आदिल दुर्रानी हा जेलमधून आता बाहेर आलाय. आदिल दुर्रानी हा सतत राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप करताना दिसतोय.

आदिल दुर्रानी याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा करत राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप हे केले आहेत. आदिल दुर्रानी म्हणाला की, राखी सावंत ही मला जीवे मारण्यासाठी योजना करत आहे. राखी सावंत आणि तिची मैत्रिण शैली लाठर हे मला जीवे मारण्यासाठी सुपारी देखील देत आहेत. आदिल दुर्रानी याचे बोलणे ऐकून सर्वजचण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

आदिल दुर्रानी म्हणाला की, माझ्या जीवाला काही झाले किंवा माझा अपघात झाला किंवा मला कोणीही जीवे मारले तरीही याला फक्त आणि फक्त राखी सावंत आणि तिची मैत्री शैली याच कारणीभूत असणार आहेत. आता आदिल दुर्रानी याचे हे बोलणे ऐकून अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी आदिल दुर्रानी हा काही कागदपत्रे दाखवताना देखील दिसला.

आदिल दुर्रानी हा जेलमध्ये असताना राखी सावंत हिने म्हटले की, आदिल दुर्रानी हा जेलमधून लवकर बाहेर यावा. कारण मला त्याला घटस्फोट द्यायचा आहे. मला एका चांगल्या जीवनसाथीची गरज आहे. कारण माझे काम इतके जास्त वाढले आहे की, यासर्व गोष्टी मला एकटीला करणे अजिबातच शक्य नाहीये. त्यामुळे मला आदिल दुर्रानी याच्यासोबत लवकर घटस्फोट घ्यायचा आहे.