एकेकाळी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होता इंडियन आयडलचा हा विजेता, ‘त्या’ गाण्याने बदललं अरिजीतचं नशीब
अरिजीत सिंह आणि अभिजीत सावंत हे 2005 सालच्या रिॲलिटी शोमुळे लोकप्रिय झाले. 'इंडियन आयडॉल' जिंकल्यावर अभिजीतचं स्टारडम गगनाला भिडलं होतं तर 'फेम गुरुकुल' हरल्यावर अरिजीत सिंग हा स्ट्रगल करत होता. पण आज आज परिस्थिती आहे की अभिजीतच्या गायकीबद्दल फारसं कोणी बोलत नाही तर अरिजितचा आवजा ऐकण्यासाठाी चाहत्यांचा रांगा लागतात. याच दरम्यान अभिजीत सावंतने त्याचा संघर्ष आणि अरिजीतचं यश यावर भाष्य केलं.

विख्यात गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) हा एकेकाळी ‘फेम गुरुकुल’ हा रिॲलिटी शो जिंकू शकला नव्हता, पण तो आज भारतातील सर्वात मोठ्या गायकांपैकी एक आहे. त्याने जेव्हा गायनातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा लाखो चाहत्यांचा हृदयभंग झाला. मात्र असं असलं तरीही आणखी काही काळ तरी अरिजीतची नवी गाणी, त्याचा आवाज सर्वांना ऐकायला मिळणार आहेत, कारण त्याच्या उर्वरित कमिटेमेंट्स तो अजून पूर्ण करत आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटात त्याच्या आवाजातलं गाणं ऐकायला मिळणार आहे. याचचदरम्यान ‘इंडियन आयडॉल 1’ चा विजेता अभिजीत सावंतने (Abhijeet Sअरिजितचं स्टारडम आणि गाण्याची स्वत:शी तुलना केली आहे. अभिजीतने इंडियन आयडॉल जिंकून देशभरात ओळख मिळवली तर अरिजीत बराच काळ कॅमेरा आणि लाइमलाइटपासून दूर राहून म्युझिक स्टुडिओमध्ये काम करत होता.
आता अभिजीतने त्या दोघांचा सुरूवातीचा प्रवास आठवत सांगितलं की एकेकाळी मी त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होतो. मात्र अरिजीतने दशकभर पडद्यामागे राहून जी मेहनत केली, त्याने पुढे त्याचं अख्खं आयुष्य बदललं.
अभिजीत बनला स्टार, अरिजीतचं स्टुडिओत काम
फिल्मीज्ञानशी बोलताना अभिजीत सावंतने अरिजीतच्या संघर्षाच्या काळाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 2005 सालानंतर अरिजीत जवळपास 10 वर्ष लाइमलाइटपासून दूर होता. त्या काळात त्याने अनेक मोठ्या संगीतकारांसोबत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र तो गायक म्हणून नव्हे तर संगीत निर्माता आणि प्रोग्रामर म्हणून काम करत होता.
तर दुसरीकडे ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनचं विजेतेपद मिळवल्यानंतर अभिजीत सावंतने मोठी लोकप्रियता कमावली. त्याला 1 कोटींचं बक्षीस मिळालं आणि सोनी सोबत एक अल्बनचा त्याने करारही केला. त्यामुळे त्या काळाता त्याचं नाव घरांघरात पोहोचलं.
एक गाणं ठरलं टर्निंग पॉईंट
अभिजीत सावंतच्या मते, त्यावेळी दोघांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी तफावत होती. एकीकडे अभिजीतवर प्रसिद्धी आणि लोकांच्या अपेक्षांचा दबाव होता, तर दुसरीकडे अरिजीत हा शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होता. अरिजीतने जवळपास 10 वर्ष कठोर मेहनत केली आणि अनेक संगीतकारांसोबत काम केलं. त्यानंतर त्याला मोठी संधी मिळाली. यादरम्यान त्याने ‘मर्डर 2’मधील ‘दिल संभल जा जरा’ हे गाणंही गायलं. पण, ‘आशिकी 2’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने त्याला खरं यश मिळालं. या गाण्यानेच त्याच्या कारकिर्दीला मोठी दिशा मिळाली आणि देशभरात त्याला वेगळी ओळख मिळाली. तोच खरा टर्निंग पॉईंट ठरला.
प्रत्येकाचा एक प्रवास असतो
अरिजीत सिंगच्या यशाबद्दल बोलताना अभिजीत सावंतने योग्य वेळ आणि नशिबाचाही उल्लेख केला. त्याच्या मते, प्रत्येक गायकाच्या आयुष्यात एखादं असं गाणं येतं, जे त्याची कारकीर्दच बदलून टाकतं. ‘तुम ही हो’ हे गाणं अरिजीतसाठी तसंच ठरलं आणि त्याला वेगळी ओळख मिळाली. अभिजीतचं मते प्रत्येक कलाकाराची वाटचाल वेगळी असते. कोणाला सुरुवातीलाच प्रसिद्धी मिळते, तर कोणाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो., असं त्याने नमूद केलं.