Netflix Web Series: नागपुरच्या नराधमाची गोष्ट! सत्य घटनेवरील ‘ही’ वेब सिरीज पाहिलीत का? डोकं चक्रावून सोडेल

कोर्टरुममध्येच एका कुख्यात गुंडाची महिलांच्या जमावाकडून हत्या होते असं कधी ऐकलंय का? ऐकून अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना महाराष्ट्रातील आहे, ज्यावर तीन भागांची एक खतरनाक डॉक्युमेट्री वेबसिरीजही करण्यात आली आहे.

Netflix Web Series: नागपुरच्या नराधमाची गोष्ट! सत्य घटनेवरील ही वेब सिरीज पाहिलीत का? डोकं चक्रावून सोडेल
| Updated on: Nov 15, 2026 | 8:47 PM

 Indian Predator: Murder in a Courtroom:  न्यायालयीन लढा, न्यायालयामध्ये न्याय मिळालेल्या कथा, चित्रपट तुम्ही याआधी अनेकदा पाहिले असतील. पण, कोर्टरुममध्येच एका कुख्यात गुंडाची महिलांच्या जमावाकडून हत्या होते असं कधी ऐकलंय का? ऐकून अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना महाराष्ट्रातील आहे, ज्यावर तीन भागांची एक खतरनाक डॉक्युमेट्री वेबसिरीजही करण्यात आली आहे. काय आहे या थ्रिलर सिरीजचं नावं अन् नेमकी स्टोरी? वाचा….

मर्डर इन अ कोर्टरुम, सत्य घटनेवरील सर्वात डेंजर वेबसिरीज! 

Loading...

नेटफ्लिक्सवर डॉक्यु-सिरीजच्या रूपात असलेल्या या सिरीजचे नाव आहे ‘इंडियन प्रेडेटर: मर्डर इन अ कोर्टरूम. ही वेबसिरीज 2022 मध्ये प्रदर्शित झाली होती. ही सिरीज महाराष्ट्रातील एका खळबळजनक खून प्रकरणावर आधारित असून याचे दिग्दर्शन उमेश विनायक कुलकर्णी यांनी केले आहे. हिंदी, मराठी आणि इतर भाषांमध्ये डब केलेल्या आवृत्त्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.

ही सिरीज महाराष्ट्रातील नागपूरच्या कस्तुरबा नगर परिसरात राहणाऱ्या अक्कू यादव, उर्फ ​​भरत कालीचरण, नावाच्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या कथेवर आधारित आहे. त्याच्यावर खून, दरोडा, खंडणी, हल्ला आणि महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचे अनेक आरोप होते. स्थानिकांच्या मते, त्याने अनेक वर्षे परिसरात दहशत माजवली होती आणि पोलीस त्याच्याविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत होते. 2004 मध्ये, जेव्हा अक्कू यादवला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या शेकडो महिलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले.

न्यायालयात हा खून कसा झाला?

13 ऑगस्ट 2004 रोजी, नागपूरच्या न्यायालयात सुनावणीदरम्यान मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, महिलांनी न्यायालयाच्या आवारात अक्कू यादवला घेरले आणि चाकू, दगड व इतर धारदार वस्तूंनी त्याच्यावर हल्ला केला, ज्यामुळे काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर  शेकडो महिलांनी आपणच खून केल्याचा दावा केल्यामुळे हल्लेखोरांना ओळखणे अवघड झाले. या माहितीपटात स्थानिक महिलांच्या मुलाखती, पत्रकारांची साक्ष, पोलीस अधिकाऱ्यांची निवेदने आणि न्यायालयातील नोंदी यांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us