Indian Telly Awards 2023 | अनुपमा-अनुजला मिळाला ‘बेस्ट कपल’चा पुरस्कार; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

| Updated on: Apr 26, 2023 | 1:43 PM

बेस्ट सिटकॉम ऑफ द इअरचा पुरस्कार 'भाभीजी घर पर है' या मालिकेला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार 'ये रिश्ता क्या कहलाता है'ला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार अर्जुन बिजलानीने पटकावला.

Indian Telly Awards 2023 | अनुपमा-अनुजला मिळाला बेस्ट कपलचा पुरस्कार; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Anupamaa
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : मुंबईत नुकताच इंडियन टेली पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर या सेलिब्रिटींचा एकापेक्षा एक ग्लॅमरस लूक पहायला मिळाला. यावेळी रुपाली गांगुली, गौरव खन्ना, उर्फी जावेद, राखी सावंत, हर्षद चोप्रा, प्रणाली राठोड, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, फहमान खान यांसारखे कलाकार उपस्थित होते. इंडियन टेली अवॉर्ड शोमध्ये प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्राने ‘फॅन फेव्हरेट जोडी’चा पुरस्कार आपल्या नावे केला. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. तर ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतील रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांना बेस्ट ऑनस्क्रीन कपलचा पुरस्कार मिळाला.

‘अनुपमा’ या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रुपालीने बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात पुनरागमन केलं. आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. याआधी तिला ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेसाठीही पुरस्कार मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये ‘फेव्हरेट निगेटिव्ह लीड्स ऑफ द इअर’ पुरस्कार करणवीर ग्रोवर आणि खलनायिकेचा पुरस्कार महक चहलने पटकावला. तर नकारात्मक भूमिकेसाठी किशोरी शहाणे यांना पुरस्कार मिळाला. ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील तिवारीजी म्हणजेच रोहिताश गौरने विनोदी कलाकाराचा पुरस्कार आपल्या नावे केला.

बेस्ट सिटकॉम ऑफ द इअरचा पुरस्कार ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार अर्जुन बिजलानीने पटकावला. सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार ‘अनुपमा’ मालिकेतील असमी देवीला मिळाला. याशिवाय बेस्ट ॲक्ट्रेस एडिटोरियल चॉइसचा पुरस्कार आशी सिंहला देण्याता आला.