Soni Razdan : हा धर्माचा विषय नाही, दिवाळीला फटाके फोडण्याच्या पोस्टवरुन झालेल्या वादावर आलिया भट्टच्या आईचं स्पष्टीकरण

Soni Razdan : आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनी दिवाळीत फटाके न फोडण्यासंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यावरुन झालेल्या वादावर सोनी राझदान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या सुद्धा एक अभिनेत्री आहेत.

Soni Razdan : हा धर्माचा विषय नाही, दिवाळीला फटाके फोडण्याच्या पोस्टवरुन झालेल्या वादावर आलिया भट्टच्या आईचं स्पष्टीकरण
Alia bhatt-Soni Razdan
| Updated on: Nov 05, 2026 | 5:38 PM

आलिया भट्टची आई आणि अभिनेत्री सोनी राझदान यांनी दिवाळीत फटाके फोडू नका असं आवाहन केलं. फटाके फोडण्याविरोधात त्यांनी मतप्रदर्शन केलं. त्यावर येणाऱ्या उलट-सुलट प्रतिक्रियावर आता सोनी राझदान व्यक्त झाल्या आहेत. फटाके फोडणं ही राष्ट्र विरोधी, आयुष्य विरोधी आणि आरोग्य विरोधी कृती आहे असं म्हटल्याबद्दल सोनी राझदान यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यावर स्पष्टीकरण देताना सोनी राझदान म्हणाल्या की, “माझं मत हे प्रदूषण विरोधी, आरोग्याशी निगडीत होतं. धर्माशी त्याचा काहीएक संबंध नाहीय” मंगळवारी रात्री उशिरा सोनी राझदान यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर हा सर्व वाद सुरु झाला. फटाक्यांचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा पालकांनी विचार करावा अशी विनंती सोनी राझदान यांनी केली होती.

हवा प्रदूषणामुळे काय-काय समस्यांचा सामना करावा लागतोय, त्यावर सोनी राझदान यांनी लिहिलय की, “हवा प्रदूषणामुळे मुलांना काय-काय सहन करावं लागतय या बद्दल तुम्हाला लहान मुलांचे पालक सांगू शकतील” “आजारपणामुळे कितीतरी दिवस मुलांच्या शाळांचे खाडे होतात. अशा परिस्थितीत माझ्यासाठी या दिवाळीत एक फटाका फोडणंही पुरेसं आहे. म्हणून माझ्या दृष्टीने हे आयुष्य विरोधी, आरोग्य विरोधी आणि हो राष्ट्रविरोधी आहे” असं सोनी राझदान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Loading...

माझ्या मेसेजचा चुकीचा अर्थ काढला

मुलांच्या आरोग्यासाठी चांगली निवड करण्यावर सोनी राझदान यांनी भर दिला. “आरोग्याची आपण आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी निवड करु शकतो. आपण योग्य निवड करु ” सोनी राझदान यांचं हे मत सोशल मीडियावर अनेकांना पटलं नाही. फटाके फोडण्यावर ‘राष्ट्र विरोधी’ हा शब्द वापरल्याबद्दल सोनी राझदान यांचं ट्रोलिंग सुरु आहे. या ट्रोलिंगवर बोलताना आज सोनी राझदान म्हणाल्या की, “माझाया मेसेजचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि तो टि्वस्ट करण्यात आला” ‘राष्ट्र विरोधी’हा माझा शब्द खराब होणाऱ्या हवेच्या गुणवत्तेसंदर्भात होता असं स्पष्टीकरण सोनी राझदान यांनी दिलं.

हा माझ्या दृष्टीने बेजबाबदारपणा आहे

“मला वाटतं तुम्ही मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. त्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करतो. ‘राष्ट्र विरोधी’ या माझ्या शब्दावरुन गोंधळ निर्माण झालाय. फटाके फोडल्याने तुम्ही राष्ट्रप्रेमी ठरत नाही आणि ते फोडायचे नाही हे ठरवल्यामुळे तुम्ही राष्ट्रविरोधी सुद्धा ठरत नाही. लोकांना श्वास घेणं कठीण होत असताना त्या हवाई प्रदूषणात भर घालणं हा माझ्या दृष्टीने बेजबाबदारपणा आहे” असं सोनी राझदान म्हणाल्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us