अखेर नाट्यावर पडदा, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जब्बार पटेल

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan jabbar patel) आहे.

अखेर नाट्यावर पडदा, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जब्बार पटेल
Follow us
| Updated on: Dec 15, 2019 | 10:34 PM

मुंबई : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan jabbar patel) आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून मोहन जोशी आणि जब्बार पटेल यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळत होती. मात्र अखेर आज (15 डिसेंबर) डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan jabbar patel) आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल यांच्यात चुरस होती. यावरुन दोन गटही तयार झाले होते. एवढंच काय तर या दोघांना मतदान करण्यासाठी समर्थकांचे फोनाफोनी आणि संपर्क अभियान सुरु असल्याची चर्चा नाट्यक्षेत्रात वेगाने पसरु लागली होती. त्यातच कार्यकारिणीने आधीच नाव जाहीर केल्यामुळे नियामक मंडळ नाराज होतं. त्यामुळे आगामी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणुकीचे नाट्य रंगणार असं चित्र तयार झालं होतं.

आता मात्र या संपूर्ण वादावरुन पडदा पडला आहे.  शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची निवड झाली आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून जब्बार पटेल यांचे नाव जाहीर करण्यात (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan jabbar patel) आले.

दरम्यान, हिंदी आणि मराठीतील डॉ.जब्बार पटेल हे मोठं नावं आहे. त्यांची नाट्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रंगकर्मींनी त्यांना शुभेच्छा दिल्या (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan jabbar patel) आहेत.

डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक नाटक आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘एक होता विदूषक’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, संविधानाचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचाही प्रवास त्यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....