AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बन्सुरी नाव कसे पडले? सुषमा स्वराज यांच्याबद्दल मुलीने सांगितल्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

निवडणूक म्हटले की प्रचार आला आणि प्रचारासाठी जेव्हा जेव्हा एखादा नेता रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याचे एक, दोन नवीन किस्से समोर येतातच. बन्सुरी स्वराज या प्रचार करत होत्या तेव्हा त्यांच्यासोबतही असा एक किस्सा घडला. मात्र, तो किस्सा घडल्यानंतर बन्सुरी स्वराज या अधिकच भावूक झाल्या.

बन्सुरी नाव कसे पडले? सुषमा स्वराज यांच्याबद्दल मुलीने सांगितल्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी
BANSURI SWARAJ Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 08, 2024 | 9:14 PM
Share

मुंबई : भाजपच्या हेविवेट दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बन्सुरी स्वराज या नव्या इनिंगची तयारी करत आहेत. भाजपने त्यांना नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. बन्सुरी या भाजपच्या दिल्ली युनिटच्या सचिव म्हणून काम करत होत्या. निवडणूक म्हटले की प्रचार आला आणि प्रचारासाठी जेव्हा जेव्हा एखादा नेता रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याचे एक, दोन नवीन किस्से समोर येतातच. बन्सुरी स्वराज या प्रचार करत होत्या तेव्हा त्यांच्यासोबतही असा एक किस्सा घडला. मात्र, तो किस्सा घडल्यानंतर बन्सुरी स्वराज या अधिकच भावूक झाल्या. एका ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला त्या गेल्या होत्या. तिथल्या प्रत्येक व्यक्तीला तिच्याशी बोलायचे होते. कारण, लोकांना त्यांच्यात सुषमा स्वराजची झलक दिसत होती. याच दरम्यान, एका महिलेने त्यांचा हात धरून भिंतीजवळ नेले. त्या भिंतीवर त्यांच्या आईचे चित्र होते. ते पाहून त्या भावूक झाल्या. हा क्षण आपण कधीच विसरू शकणार नाही, असे बन्सुरी स्वराज्य म्हणाल्या.

येत्या 25 मे रोजी दिल्लीत लोकसभेच्या निवडणुकासाठी मतदान होणार आहे. अन्य उमेदवार यांच्याप्रमाणेच बन्सुरी या जनतेशी संवाद साधत आहेत. जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना प्रंचड गर्दी होत आहे. बन्सुरी स्वराज यांच्या अनेक राजकीय मुलाखती आणि राजकारणावरील संभाषणे प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही. याबद्दल स्वतः बन्सुरी यांनी अधिक माहिती दिली. त्यांचा आवडता चित्रपट, आवडती डिश आणि आई सुषमा स्वराज यांच्याशी संबंधित काही किस्सेही त्यांनी सांगितले.

बालपणीचे किस्से आठवताना बन्सुरी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, आई सुषमा स्वराज राजकारणात असताना लोकांना त्या मजबूत व्यक्ती दिसत होत्या. पण, माझ्यासाठी ती फक्त माझी आई होती. ती जेव्हा कधी घरात यायची तेव्हा तिचा राजकीय पोशाख बाजूला असायचा. लहान असताना आई स्वतःच्या हाताने जेवण बनवून खायला घालायची. आजही आवडती डिश म्हणजे मसूर डाळ आणि भात हाच आहे.

आई सुषमा स्वराज यांची कृष्णावर असीम भक्ती होती. कृष्णाला बासरी खूप आवडायची म्हणूनच माझे नाव बन्सुरी ठेवण्यात आले. ही कृष्णभक्ती त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. शेवटचा चित्रपट आई सुषमा स्वराज यांच्यासोबत पाहिला. या चित्रपटाचे नाव होते ‘उरी’. आजही हा चित्रपट पाहिल्यानंतर उत्साह खूप वाढला. याशिवाय ‘इजाजत’ हा आवडता सिनेमा आहे. त्याचे कारण म्हणजे हा चित्रपट तिच्या आई आणि वडिलांचा आवडता सिनेमा आहे. अनेकदा त्यांच्यासोबत बसून हा चित्रपट पाहिला आहे अशी आठवण त्या सांगतात.

रस्त्यावरील गोलगप्पा आवडते खाद्य

दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बन्सुरी ध्यानधारणा करतात. यासोबतच निवडणूक प्रचार संपल्यानंतर रात्री गरम पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवून सर्व थकवा दुर करतात. प्रचारादरम्यान आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. सध्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवत असले तरी खूप निवडक खाणेच पसंद करतात. त्या म्हणतात, ‘मी दिल्लीची आहे त्यामुळे मला खाणेपिणे खूप आवडते. कधी करोलबागमध्ये स्ट्रीट फूडचा आस्वाद घेते. तर कधी लाजपत नगरमध्ये मूग डाळ लाडू खाते. पण त्यातही गोलगप्पा हे सर्वात आवडते स्ट्रीट फूड आहे. मला गोलगप्पा इतके आवडतात की लंडनला ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना गोलगप्पांची खूप आठवण यायची. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लंडनसारख्या शहरातही गोलगप्पाचे दुकान सापडले होते. पण, त्याला दिल्लीसारखी चव नव्हती हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.

कॉलेज दिवसातील एक प्रसंग आठवताना त्या म्हणतात, मला जेवणाची आवड आहे. स्वयंपाक कसा करायचा हे माहित आहे. पण, आजही रोटी कशी बनवायची हे माहित नाही. ऑक्सफर्डमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होते. एके दिवशी आई सुषमा स्वराज त्यांना भेटण्यासाठी ऑक्सफर्डला आल्या. बन्सुरीने आईचे सर्व आवडते पदार्थ तयार बनविले. पण, आईने जेवण सुधारण्याचा सल्ला दिला. आई भारतात परतली परंतु दोन महिन्यांनी वडील भेटण्यासाठी ऑक्सफर्डला पोहोचले. बन्सुरीने वडिलांसाठीहीन जेवण बनवले. टेबलावर अनेक पदार्थ पाहून वडिलांनी आपली गाडी विद्यापीठाच्या दिशेने वळविली. त्यांनी प्राध्यापकांना विचारले, ती स्वयंपाकच करते की अभ्यासही करते? त्यावर प्रोफेसर म्हणाले, बन्सुरी वर्गातील टॉपर मुलींपैकी एक आहे. हे ऐकून वडिलांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. स्वयंपाक करू नको अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असे त्यांना सांगितले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.