‘बारामतीत मतदारांची टक्केवारी घसरली, तरीही…’, हर्षवर्धन पाटील यांचा मोठा दावा

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टप्पा घसरला आहे. यावरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. असं असलं तरी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'बारामतीत मतदारांची टक्केवारी घसरली, तरीही...', हर्षवर्धन पाटील यांचा मोठा दावा
'बारामतीत मतदारांची टक्केवारी घसरली, तरीही...', हर्षवर्धन पाटील यांचा मोठा दावा
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 9:34 PM

बारामती लोकसभा मतदारसंघात नुकतंच मंगळवारी मतदान पार पडलंय. मात्र 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज असताना तो वाढण्याऐवजी घसरला गेलाय. यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे क्लस्टर प्रमुख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मतांची टक्केवारी कमी झाली याची खंत आहे. काहींचा अनुमान असा असतो की टक्केवारी वाढली म्हणजे कुणालातरी धोका आहे. काहींचं म्हणणं आहे की, टक्केवारी कमी झाल्यावर कुणाचातरी फायदा होतो. पण एकंदरीत मला असं वाटतं की सुनेत्रा पवार या निश्चितपणाने निवडून येतील, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावाही हर्षवर्धन पाटील यांनी खोडून काढलाय. “कुठल्याही निवडणुका या कोणाच्या अस्मितेच्या नसतात. जर अस्मितेच्या असत्या तर मतदानाचा टक्का 75 ते 80 टक्के व्हायला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये 75 ते 80 टक्क्यांपर्यंत मतदान होतं. तिथली परिस्थिती वेगळी आहे. तिथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना आहे. दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे. पण त्या अस्तित्वात रूपांतर टक्केवारीत व्हायला पाहिजे असं नुसतं म्हणून चालत नाही. ही बाहेरची लोक असतात. मतदारसंघात आम्ही काम करतो”, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.

विरोधकांना निवडणूक आयोगाच्या कार्यावर शंका

दरम्यान, विरोधकांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर शंका आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी 11 दिवसांत कशी वाढली? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या दोन्ही टप्प्यांचे मिळून 60 टक्के सरासरी मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं होतं. मात्र 11 दिवसांनी म्हणजेच 30 एप्रिलला 66 टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. याचाच अर्थ आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत 6 टक्क्यांचा फरक आहे. याचबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.