AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG : आयुष बदोनी-निकोलस पूरनची शानदार बॅटिंग, हैदराबादसमोर 166 धावांचं आव्हान

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants 1st Innings Highlights In Marathi : अनकॅप्ड आयुष बदोनी याने लखनऊसाठी निर्णायक अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पूरनने आयुषला चांगली साथ दिली.

SRH vs LSG : आयुष बदोनी-निकोलस पूरनची शानदार बॅटिंग, हैदराबादसमोर 166 धावांचं आव्हान
Ayush Badoni and Nicholad PooranImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 08, 2024 | 9:48 PM
Share

आयुष बदोनी आणि निकोलस पूरन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलल्या नाबाद निर्णायक भागीदारीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं सन्मानजनक आव्हान दिलं आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या लखनऊची निराशाजनक सुरुवात राहिली. लखनऊला पावरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावून फक्त 27 धावाच करता आल्या. त्यानंतर 2 विकेट्स या ठराविक अंतराने गमावल्या. मात्र त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे लखनऊला 150 पार पोहचता आलं.

लखनऊची बॅटिंग

क्विंटन डी कॉक 5 बॉलमध्ये 2 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मार्क्स स्टोयनिसने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर कॅप्टन केएल राहुल आणि कृणाल पंड्या या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न काही वेळेसाठीच यशस्वी ठरला. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सने टी नटराजन याच्या हाती केएलला 29 धावांवर कॅच आऊट केल. त्यानंतर कृणाल पंडया 24 धावांवर रन आऊट झाला. पॅट कमिन्सच्या अचूक थ्रोमुळे कृणालला मैदानाबाहेर जावं लागलं.

कृणाल पंड्या आऊट झाल्याने लखनऊची स्थिती 11.2 ओव्हरमध्ये 4 बाद 66 अशी झाली. त्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनी या जोडीने लखनऊची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये नाबाद 99 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे लखनऊला 20 ओव्हरमध्ये 165 पर्यंत मजल मारता आली. निकोलस पूरन याने 30 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. तर निकोलसने 26 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 48 रन्स केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर पॅटच्या खात्यात 1 विकेट गेली.

हैदराबादसमोर 166 धावांचं आव्हान

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.